कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीने एक मोठं वक्तव्य केलं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी कंगना हिने राजकारणातील एन्ट्रीचे संकेत दिले आहेत. ‘तेजस’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री गुजरात येथील द्वारका मंदिरात पोहोचली होती. अभिनेत्री देवाचे दर्शन घेतले आणि माध्यमांसोबत संवात साधला. कंगना हिने राजकारणातील प्रवेशाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘जर श्री कृष्णाची कृपा असले तर लोकसभा निवडणूक लढवेल…’ असं अभिनेत्री म्हणाली आहे…