निलंगा तालुका शिक्षक पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार
निलंगा-लातूर जिल्ह्यात सर्वात मोठी असलेली पतसंस्था पंचवार्षिक संचालक पदाच्या निवडणुकीत 13 जागेसाठी निवडणूक झाली.या निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत ज्ञानदेव गुंडरे यांचे सात तर विद्यमान चेअरमन अरुण सोळुंके यांचे 6 सदस्य निवडून आले. निवडून आलेले ज्ञानदेव यांचे सात संचालक यांचे लातूर जिल्हा बँकेचे संचालक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पॅनल प्रमुख ज्ञानदेव गुंडरे यांच्यासह नवीन संचालक आनंद जाधव,राहुल मोरे,अंजली सूर्यवंशी-भोसले, विजयसिंह भोसले,ज्ञानोबा मोरे, बब्रुवान सोनटक्के,प्रकाश सराटे लक्ष्मण बोटले व आदी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अशोकराव पाटील म्हणाले की निवडणुकीपुरते राजकारण करु पाहणाऱ्या पंचवार्षिक कार्य काळामध्य सर्वांना सोबत घेऊन पतसंस्थेच्या नावलौकिक वाढवावा निलंगा पतसंस्था ही अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करीत असून आपल्यासमोर उभे टाकूलेले पराभूत झालेल्या उमेदवाराना आपले समजून आपल्या सोबतघेऊन,निवडून आलेल्या आपल्या विरोधी संचालक सोबत निवडणुकीत झालेले वादविवाद विसरून सर्व शिक्षक सभासदांना समान न्याय द्यावा.अशी अपेक्षा व्यक्त करून निवडून आलेल्या सर्व संचालकांना पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.