कोकळगाव येथे आद्य कवी रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी जयंती निमीत्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
लातूर: रविवार दिनांक 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता आद्य कवी रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी जयंतीचे औचित्य साधत निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील द्रोणाचार्य क्लासेस मध्ये कोकळगावचे भूमिपुत्र सामाजिक कार्यकर्ते सध्या सांगली येथे स्थायिक असलेले, सन्माननीय विजयकुमार किसनलाल लडडा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्कूल बॅगस्, कंपास, रजिस्टर,वह्या,पेन वर्क बुक इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी निलंगा कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल कामले, निलंगा पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक धोंडीराम कोळी, संजय उजने, वसंतराव मंजुळे, दत्तात्रय मुरमे, जिवन लामतुरे क्लासेसचे संचालक संपादक द्रोणाचार्य कोळी व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थीती होती. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच प्रिती हिप्परगे,ओमकार आगलावे, यशोदीप विठुबोने, त्रिशला मंजुळे, महादेव मंगणे इत्यादी विद्यार्थ्यांनी वाल्मिक ऋषी यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते वसंतराव मंजुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.