जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य चा द्वितीय वर्धापन दिन अनोख्या पद्धतीने साजरा..
महाराष्ट्रातील ३० सामाजिक संस्थांना प्रदान केला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार
बदलापूर -(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य या समाजिक संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन नुकताच बदलापूर येथे पार पडला. संस्थापक श्री गुरुनाथ तिरपणकर आणि संस्थेच्या पदाधिकऱ्यांनी ह्या वर्धापन दिनी संस्थेच्या माध्यमातून ३० सामाजिक संस्थांना राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार २०२२ ने सन्मानित केले.
प्रमाणपत्र, शिल्ड आणि गुलाबपुष्प असे पुरस्काराचे स्वरूप होते. सामाजिक संस्थांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या पाठीवर पुरस्काररुपी कौतुकाची थाप देणारी जनजागृती सेवा समिती ही एकमेव संस्था ठरली. जनजागृती सेवा समितीच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात संस्थेने केलेल्या सामाजिक कार्याची माहितीपर चित्रफीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वर्धापन दिनाला प्रमुख मान्यवर म्हणून श्री दिलीप नारकर, रामजीत गुप्ता, शिवराम चव्हाण, ज्ञानेशानंद शास्त्री महाराज, श्री राजेश कदम, अमित दुखंडे, सिद्धी कामथ, प्रेरणा गावकर आदी मान्यवर तसेच राज्यभरातून विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री विजय वक्ते हे या समारोहाचे प्रमुख अतिथी होते. जनजागृती सेवा समितीच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक श्री गुरुनाथ तिरपणकर, सचिव सौ. संचिता भंडारी आणि पदाधिकारी यांना उपस्थित मान्यवर आणि संस्थाचालकांनी शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. आगामी काळातील संस्थेच्या विविध सामाजीक उपक्रमांची माहिती श्री गुरुनाथ तिरपणकर यांनी दिली, तसेच संपूर्ण राज्यभर संस्थेचा विस्तार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यापैकी काही जिल्ह्यांमध्ये संस्थेचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यभरातून सामाजिक कार्यात आवड असलेल्या अनेक लोकांचा संपर्क होत असून लवकरच राज्यभर संस्थेचे कार्य सुरू होईल असा विश्वास संस्थापकांनी दिला. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी दीपक वायंगणकर, एकनाथ गायकर, सचिन भंडारी, प्रसाद उकार्डे, भावना परब, कनिष्का कडूलकर, मेघा भालेकर, शुभम नेटके, महेश्वर तेटांबे, सौरभ टकले आणि गंधाली तिरपणकर यांचे विशेष योगदान व सहकार्य लाभले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक गुरुनाथ तिरपणकर आणि गंधाली गुरुनाथ तिरपणकर यांना त्यांनी अभिनय केलेल्या आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत महेश्वर भिकाजी तेटांबे लिखित-दिग्दर्शित शिदोरी या लघुपटाला उत्कृष्ठ लघुपट म्हणुन मिळालेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीता काटकर यांनी केले. प्रस्तावना संस्थेच्या सचिव सौ. संचिता भंडारी यांनी केली. आणि आभार प्रदर्शन खजिनदार श्री दत्ता कडुलकर यांनी केले. स्नेह- भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.