सोलापूर: शहरात केसीआर यांच्या कन्या आमदार कविता अक्का आल्या होत्या. नवरात्रोत्सव काळात सोलापूर शहरातील पद्मशाली समाजात ब्रतुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारी दुपारी केसीआर कन्या कविता ब्रतुकम्मा उत्सवात सहभागी झाल्या होत्या. माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या घरी तेलंगणाच्या आमदार कविता आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १०५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
तेलंगणा राज्यात बीआरएस पक्ष तगडी फाईट देईल. भाजपने लिस्ट जरी जाहीर केली तरी बीआरएस पक्षाला काहीही फरक पडणार नाही, अशी बीआरएसच्या आमदार कविता अक्का यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेलंगाणा राज्यात के चंद्रशेखर राव गेल्या दोन टर्म तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले आहेत. बीआरएस पक्ष दक्षिण भारतात इतिहास करण्याच्या तयारीत आहे. यावेळी देखील के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री होतील आणि इतिहास घडवतील. भाजप असो किंवा काँग्रेस असो बीआरएस पक्षाला जनतेचा पाठिंबा आहे. टीव्हीवर आलेल्या ओपिनियनवर विश्वास नाही. आम्ही जनतेच्या ओपिनियन पोलवर विश्वास ठेवत आहोत, असे म्हणत कविता अक्का यांनी तेलंगाणाच्या सत्तेवर दावा ठोकला आहे.