विलास को. ऑपरेटीव्ह बॅकेच्या महिला शाखेच्या कामकाजाला सुरूवात नवरात्रोत्सवानिमीत्त महिला शक्तीचा सन्मान
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या अधिमंडळाच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत महिला शक्तीच्या सन्मानासाठी विलास को. ऑपरेटीव्ह बॅकेची एक शाखा महिला शाखा करण्यात येईल अशी घोषणा केली होती. या अनुषंगाने औसा रोड येथील विलास को. ऑपरेटीव्ह बॅकेची महिला शाखा करण्यात आली असून या शाखेचे पूर्ण प्रशासकीय संचालन महिला करणार आहेत. या महिला शाखेची सुरूवात नवरात्रोत्सवातील पहिल्या दिवशी संचालीका डॉ.सौ.जयदेवी पांडुरंग कोळगे आणि सर्व संचालक आणि महिला कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
लातूर शहरातील औसा रोड येथील विलास को.ऑपेरेटीव्ह महीला शाखेची सुरूवात सोमवार दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी महिला संचालीका डॉ. सौ. जयदेवी पांडुरंग कोळगे, व्हा.चेअरमन चंद्रकांत देवकते, संचालक सूर्यकांत ज्ञानेश्वर कातळे, सुरेश अंजीरराव धानुरे, सुनील नामदेवराव पडिले, तज्ज्ञ संचालक व्यंकटेश विश्वाभर पुरी, सौ. खाजाबानू नय्युम अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या अधिमंडळाच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत महिला शक्तीच्या सन्मानासाठी विलास को. ऑपरेटीव्ह बॅकेची एक शाखा महिला शाखा करण्यात येइल असे घोषीत केल्या प्रमाणे औसा रोड येथील विलास को. ऑपरेटीव्ह बॅकेची शाखा महिला शाखा करण्यात आली आहे. या शाखेची सुरूवात नवरात्रोत्सवातील पहिल्या दिवशी संचालीका जयदेवी कोळगे आणि सर्व संचालक आणि महिला कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शाखेचे पूर्ण प्रशासकीय संचालन महिला करणार आहेत. यामध्ये शाखा अधिकारी कु.स्नेहा सुरेश हलगरकर, रोखपाल श्रीमती वनश्री पुरी, सौ. प्रतिभा सोनवणे, कु. दुर्गा कवठे, सौ. सोनिया पाडे, सौ. महादेवी ठाकूर, कु. पूजा मूळे, सौ. निलोफर शेख, श्रीमती. अक्षता साबळे, सौ. प्रतिभा बन, सौ. रक्षिता गिरी, सौ. प्रतिभा भोसले या कामकाज पाहणार आहेत. शाखा शुभारंभा निमित्त 1,51,000 ची ठेवी ठेवण्यात आल्या, यांचे स्वागत संचालीका जयदेवी कोळगे यांनी केले