• Wed. Jun 18th, 2025

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना येथे बाॅयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ संपन्न

Byjantaadmin

Oct 24, 2023
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना येथे बाॅयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा शानदार शुभारंभ संपन्न
चालू गळीत हंगाम यशस्वी करून अधिक दर देण्याची परंपरा कायम ठेवणार-माजी मंत्री तथा चेअरमन दिलीपरावजी देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर विलासनगर- विकासरत्न  विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ३७ वा गळीत हंगाम २०२३- २४ चा बाॅयलर अग्नी प्रदीपन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन  दिलीपराव देशमुख, राज्यांचे माजी वैधकिय शिक्षण मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख लातूर ग्रामीणचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख  यांच्या हस्ते मंगळवारी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर  संपन्न झाला  यावेळी माजी आमदार अँड त्र्यंबक भिसे,राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन श्रीपतराव काकडे, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल उटगे,लातूर बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,२१ शुगरचे उपाध्यक्ष  विजय देशमुख,विलास कारखान्याचे उपाध्यक्ष रविंद्र काळे,
मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे, उपाध्यक्ष  शाम भोसले,मांजरा साखर कारखान्याचे सर्व  संचालक मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडित देसाई,विलास कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई, मांजरा परिवारातील सर्व संस्थांचे सन्माननीय संचालक मंडळ पदाधिकारी मान्यवर
याची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना अधिक दर देण्यासाठी आम्हीं कटिबध्द-माजी मंत्री चेअरमन दिलीपराव देशमुख
यावेळी मनोगत व्यक्त करत असताना माजी मंत्री कारखान्याचे अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख म्हणाले की, मांजरा कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमता विस्तार केल्याने शेतक-यांचा ऊस तत्परतेने  गाळप होण्यासाठी मदत होणार असुन  साखरे सोबतच उपपदार्थ निर्मितीतून शेतकऱ्यांना अधिकचा दर देण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तत्पूर्वी  बाॅयलर अग्नी प्रदीपनासाठी कारखान्याचे संचालक वसंतराव ऊफाडे यांच्या हस्ते सपत्नीक पुजन झाले तसेच गळीत हंगामासाठी संचालक नवनाथराव काळे यांच्या हस्ते सपत्नीक विधीवत पुजन संपन्न झाले.यावेळी शेतकरी सभासद, कारखाना खाते प्रमुख, अधिकारी,कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *