• Thu. Jun 19th, 2025

पोलीस दिनानिमित्त लातूर पोलीस मुख्यालयात दिली मानवंदना

Byjantaadmin

Oct 21, 2023
पोलीस दिनानिमित्त लातूर पोलीस मुख्यालयात दिली मानवंदना
▪️ जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित
 लातूर दि.21 ( जिमाका ) आज पोलीस स्मृती दिन आहे, त्यानिमित्ताने कर्तव्य बजावत असतांना विरगती प्राप्त झालेल्या पोलीस शहीदांना मानवंदना देण्यात आली. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या शहीद स्मारक  येथे सकाळी 08:00 वाजता लातूर पोलीस दलाच्या वतीने ही मानवंदना देण्यात आली.
    1 सप्टेंबर 2022 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत भारताच्या विविध राज्यामधील पोलीस ठाणे तसेच विशेष पथकांमध्ये कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या 189  वंदनीय वीर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
     लडाख मधील भारतीय सीमेवरील बर्फाच्छादीत व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी भारताचे 10 पोलीस जवान गस्त घालत असताना 21 ऑक्टोंबर 1959 रोजी अचानक दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्याला शेवटपर्यंत चोख प्रत्युत्तर देत असताना त्यांना वीरगती प्राप्त झाली. या वीर जवानांनी आपल्या देशाच्या सीमेची रक्षण करताना दाखविलेल्या या उच्च कोटीच्या शौर्यांची गाथा इतरांना कळावी तसेच राष्ट्रनिष्ठा, कर्तव्य निष्ठ भावनेची ज्योती प्रत्येकाच्या मनात तेवत राहावी म्हणून शहीद पोलीस जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिनांक 21 ऑक्टोंबर हा दिवस संपुर्ण भारतभर पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.
        या स्मृती दिन मानवंदनेसाठी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक, श्री सोमय मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव लातूर, श्री वैभव कलबुर्गे, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, प्रभारी पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक श्री सोनकवडे, यांनी तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व अमलदारांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन शस्त्र सलामीसह मानवंदना दिली.
     यावेळी राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री दिलीप माने यांचे नेतृत्वाखालील प्लाटूनने सलामी शस्त्र, शोक शस्त्र करून हवेमध्ये 03 गोळ्यांच्या फैरी झाडून शहिदांना मानवंदना दिली.  यावेळी सूत्रसंचालन व शहिदांचे नाव वाचन सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री दयानंद पाटील व महिला पोलीस उपनिरीक्षक मनीषा लटपटे -हंगे यांनी केले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील 45 पोलीस अधिकारी व 350 पोलीस अंमलदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *