ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अंबुलगा कारखाना करणार दिवाळी गोड…
गतवर्षी ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप करण्याचा निर्णय
निलंगा/प्रतिनिधी
अंबुलगा बु तालुका निलंगा येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना लिज ओंकार शुगर प्रा.लि.युनिट क्रमांक २ या साखर कारखान्याकडून गतवर्षी ऊस घातलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व कारखाना कामगारांना मोफत साखर वाटप करण्याचा निर्णय कारखाना प्रशासनाने घेतला आहे.यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची यावर्षीची दिवाळी गोड होणार आहे.अशी माहिती माजी मंञी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यानी दिनांक १८ वार बुधवार रोजी पञकार परिषदेत दिली आहे.
निलंगा देवणी शिरूर अनंतपाळ या तीन तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखाना अंबुलगा बु हा कारखाना ओंकार शुगर प्रा.लि.यानी चालवण्यास घेतल्यामुळे कारखाना कार्यक्षेञातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.कारखाना सक्षमपणे चालावा या भागातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर व्हावी म्हणून माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदारीच्या स्पर्धेत टिकायाचे असेल तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले पाहिजे म्हणून चांगला भाव देणे हे कर्तव्य समजून अंबुलगा साखर कारखान्यात सहप्रकल्प उभारल्याशिवाय शक्य होणार नाही म्हणून डिसलरी वाटर,को-जनरेशन,खत व सीएनजी अशा प्रकल्पाचे भूमिपुजन केले असून या सर्वच प्रकल्पाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.कारखाना भाडे तत्वावर घेतल्यावर तीन महिण्यातच ओंकार कारखान्याचे सर्वेसर्वा बाबुराव बोञे पाटील यानी कारखाना चालु केला पहिल्या वर्षामध्ये एक लाख टनाचे गाळप करून दाखवल्याने हा कारखाना दिर्घकाळ चालणार अशी भावना शेतकऱ्यामध्ये निर्माण झाली आहे.
माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांनी गतवर्षी अंबुलगा कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त मोफत साखर वाटप करा असा मनोदय व्यक्त केल्यामुळे अंबुलगा कारखाना प्रशासनाने ५० मेट्रीक टन पर्यंत ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना २० किलो साखर ५१ ते १५० मेट्रिक टन ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना ३० किलो व १५० मेट्रीक टन ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना ५० किलो मोफत साखर दिवाळी निमित्त वाटप करण्याचा निर्णय झाला असल्याचे आ.निलंगेकर यानी सांगितले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे,दगडू सोळुंके हजर होते.
यंदा पाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उदिष्ट चेअरमन बोञे पाटील ….
गतवर्षी पहिलाच हंगाम असल्यामुळे कारखाना सुरू होणार का नाही असा संभ्रम शेतकऱ्यामध्ये होता.कारखाना मशिनरीचे काम युध्दपातळीवर करून कारखाना सुरू केला .जवळपास एक लाखा मेट्रीक टन गाळप केले आहे.यंदा २१ आॕक्टोबर रोजी कारखाना बाॕयलर अग्नी प्रदिपन कार्यक्रम होणार असून १ नोव्हेंबर पासून कारखान्याचे प्रत्यक्ष गाळप सुरू होणार आहे.यंदा पाच लाख मेट्रिक टनाचे गाळप अंबुलगा कारखाना करणारच असल्याची ग्वाही ओंकार शुगर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यानी दिली आहे.