निलंगा (प्रतिनिधी):-निलंगा शहरात सर्वधर्मीय सार्वजनिक जयंती महोत्सव समीती व महाविकास आघाडीच्या वतीने शेर -ए – हिन्द शहीद टिपु सुलतान यांची 272 वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये सर्वधर्मीय सार्वजनिक जयंती महोत्सव समीती व महाविकास आघाडीच्या वतीनेपुष्पहारअर्पण करून विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की या देशात जे राजे होऊन गेले त्यानी जातपात न मानता मानवतेचा धर्म शिकवला व मानवतेचा विचार जोपासला. कोण कोणत्या धर्मात जन्मावे हे त्याच्या हातात नसते, परंतु आपण चांगले- वाईट काय हे ठरवण्याचा अधिकार आहे. परंतु आताच्या काळात काही जातीयवादी लोक स्वतः च्या स्वार्थासाठी महापुरुषांची निंदा नालस्ती करून जनतेमध्ये फुट पाडुन धर्मा-धर्मा भांडणे लावून राजकारण करत आहेत. हा प्रयत्न आपण सर्वानी हाणून पाडला पाहिजे असे आवाहन केले. यावेळी विजयकुमार पाटील ता. अध्यक्ष कांग्रेस आय, विनोदजी आर्य शिवसेना जिल्हा उपप्रमुख, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, अविनाश रेशमे ता. प्रमुख शिवसेना अजीत माने माजी उपसभापती, इस्माईल लद्दाफ शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, विलास सूर्यवंशी आर.पि.आय.टि.एम.कांबळे गट प्र,सरचिटणीस, अंकुश ढेरे जिल्हा उपाध्यक्ष आर. पि.आय.आठवले गट, सामजिक कार्यकर्ते नसीमोदीन खतीब, वहीद वळसंगकर रजनीकांत कांबळे, वंचित आघाडीचे युवराज जोगी, देवदत सुर्यवंशी, आदींनी आपले टिपु सुलतान यांच्या जिवन चरीत्रावर प्रकाश टाकला व येणाऱ्या पिढी समोर टिपु सुलतान यांचा खरा इतिहास मांडण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. यावेळी प्रामुख्याने डॉ. अरविंद भातंब्रे डॉ. लालासाहेब देशमुख शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद कदम, एम. आय. एम. चे तालुका अध्यक्ष शाहरुख सय्यद, झटींग म्हैत्रे, वंचित आघाडीचे सुनील सुर्यवंशी, गणराज्यचे रामलींग पटसाळगे, जाकेर मित्र मंडळाचे इस्माईल खुरेशी,अमोल सोनकांबळे युवक काँग्रेसचे विधानसभाध्यक्ष,असगर अंसारी विधानसभाध्यक्ष (अल्पसंख्यक) रोहित बनसोडे बौद्ध महासभा, धमानंद काळे युवक शहराध्यक्ष, गोविंद सुर्यवंशी, दिगंबर सूर्यवंशी अजय कांबळे, समद शतारी, टीपु सुलतान संघटनेचे सबदर कादरी बाबा बिबराले नदिम खुरेशी, सोहेल शेख, जुबेर चोधरी, शेरु शेख आवेज शेख तसेच राष्ट्रवादीचे समीउलाह कादरी, महादेवी पाटील, मुन्नाबी मोमीन, शिवसेनेच्या दैवशील सगर व इतर महीला व नागरिक उपस्थित होते यावेळी सुत्रसंचलन व आभार मुजीब सौदागर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष यांनी केले.
निलंगा शहरामध्ये मागच्या वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पासुन सर्वच महापुरुषांच्या जयंती सर्वधर्मीय जयंती व महाविकास आघाडीच्या वतीने साजरी करुन त्यांचे विचार व सत्य इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे व जनतेमध्ये धार्मिक सलोखा व सामाजीक सदभाव निर्माण करून राष्ट्रीय एकात्मता व अखंडता, शांतता व भाईचारा निर्माण करण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. 25.11.2022 ला मुशायरा चे आयोजन करण्यात आले आहे.
तरी कृपया यानिमित्ताने आचार – विचार देवान – घेवाण करून सामाजिक एकता व अखंडता वाढीस सहयोग करावे विनंती करण्यात आली.
निलंगा शहरात सर्वधर्मीय सार्वजनिक जयंती महोत्सव समीती व महाविकास आघाडीच्या वतीने शेर -ए – हिन्द शहीद टिपु सुलतान साजरी
