• Wed. Apr 30th, 2025

राज्यात थंडीचा जोर वाढला, विविध जिल्ह्यात तापमानात घट तर…

Byjantaadmin

Nov 20, 2022

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यातील विविध जिल्ह्यात तापमानात  घट होत असल्याचं दिसून आलय. यामुळे नागरिक थंडीपासून संरक्षणाबरोबरचं थंडीचा आनंद घेताना सुद्धा दिसत आहे.  महाबळेश्वरात तापमान 8 अंशांवर पोहोचलंय. तर वेण्णालेक 6 अंशांवर घसरलंय. तिकडे परभणीत यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. परभणीत तापमान 8.3 अंशांवर पोहोचलंय. नाशिकमध्येही हुडहुडी भरलेय. तर पुण्यातही थंडीची चाहुल लागल्यानं पुणेकरांचे स्वेटर्स, कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला आहे

मागच्या तीन दिवसांपासून परभणी जिल्ह्यात थंडीची लाट निर्माण झाली असून सातत्याने तापमान घसरत आहे काल तापमान 10 अंशावर होते तर आज तापमान हे 8.3 अंशापर्यंत घसरले आहे. यामुळे सर्वत्र थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर जाणू लागला आहे. ग्रामीण भागातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. शहरांमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागतोय.सर्वत्र नागरिक या गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत

महाबळेश्वरातील  तापमानात आणखी घट  झाली असून महाबळेश्वरातील तापमान 8 अंशावर तर वेण्णालेक 6 अंशावर गेले आहे. मात्र दवबिंदू गोठले नाहीत. घसरलेल्या तापमानामुळे महाबळेश्वरवासीय आणि पर्यटक चांगलेच गारठले

नाशिकमध्ये किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याचं बघायला मिळत असून निफाडमध्ये 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची आज नोंद झाली आहे.  आठवडाभरातच हा पारा तब्बल 6 अंशांनी घसरला आहे तर नाशिक शहरात देखील पारा 9.8 अशांवर येऊन पोहोचल्याने नाशिककर सध्या चांगलेच गारठले आहेत.

राज्याच्य बहुतांश भागाला थंडीनं हुडहुडी भरली असून, ग्रामीण भागात सकाळी सकाळी धुकं पडलेलं बघायला मिळतं आहे. ठिकठिकाणी पहाटे आणि भल्या सकाळी लोक शेकटोची ऊब घेताना दिसत आहेत.  नाशिकसह राज्यातील इतर जिह्यातही थंडीचा जोर वाढला आहे. तर पुण्यातही थंडीचा जोर चांगलाच वाढला असून, थंडीपासून बचावासाठी पुणेकर कानटोप्या, स्वेटर घालून चहाचा आस्वाद घेत आहेत. तर कुठे व्यायाम करताना दिसत आहेत.रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्यानं शेतकरी आनंदला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed