• Sat. Jun 21st, 2025

श्री दुर्गामाता शारदीय नवरात्र महोत्सवाची पहिल्या वर्षाची पहीली पूजा वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न

Byjantaadmin

Oct 16, 2023

श्री दुर्गामाता शारदीय नवरात्र महोत्सवाची पहिल्या वर्षाची पहीली पूजा वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न
सांस्कृतीक आणि पारंपरीक पध्दतीने शोभा यात्रा, विविध स्पर्धाचे आयोजन

लातूर प्रतिनिधी १५ आक्टोंबर २३ : श्री दुर्गामाता शारदीय शारदीय नवरात्र महोत्सव खडक हनुमानच्या पाठीमागे, नावंदर गल्ली, लातूर येथे आईची स्थापना करण्यात आली. विलास सहकारी साखर कारखाना ली.च्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते पारंपरीक पध्दतीने विधिवत पहीली पूजा करण्यात आली.
लातूर येथील नावंदर गल्ली येथे श्री दुर्गामाता शारदीय नवरात्र महोत्सव सुरू करण्यात आला आहे. या मंडळाच्या अध्यक्षा माजी नगरसेविका स्नेहलता अग्रवाल, उपाध्यक्ष कु प्रियंका रामढवे, सचिव- सौ ज्योती ठोंबरे, सहसचिव- सौ आशा राचट्टे, कोषाध्यक्ष- सौ अनुराधा माने, सहकोषाध्यक्ष सौ. रेणू शर्मा यांच्या पुढाकारातून हा महोत्सव सुरू करण्यात आला आहे. या मंडळाच्या वतीने सांस्कृतीक आणि पारंपरीक पध्दतीने शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत देवी, देवता आणि महापुरूषाच्या वेषातील बालगोपालांनी
सर्वांचे लक्ष वेधून घेतले. घटस्थापना नवरात्रोत्सव निमित्ताने श्री दुर्गामाता शारदीय शारदीय नवरात्र महोत्सवाच्या वतीने आईची स्थापना करण्यात आली. यानंतर विलास
सहकारी साखर कारखाना ली.च्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते पारंपरीक पध्दतीने विधिवत पहीली पूजा करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवीका सौ. जान्हवीताई सुर्यवंशी, सौ. गीता गौड यांची प्रमुख उपस्थिती होती. या मंडळाच्या वतीने रांगोळी स्पर्धा, दांडिया स्पर्धा, फॅन्सी ड्रेस कॉम्पीटिशन, संगीत खुर्ची, इतर स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत. हा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सौ. संगीता शेंदे, सौ. विटा कदम, सौ. सविता जोशी, सौ. पायल चांडक, सौ. कोमल चांडक, सौ. माया भुतडा, सौ. प्रियंका पांडे, सौ. मंगल जोशी, सौ. सोनल झंवर, सौ. ममता व्यास, सौ. मनिषा सुरवसे, सौ. रेखा सुरवसे, सौ. सरिता माने, सौ. अनिता पुरोहित, सौ. आदिती कुलकर्णी, सौ. शुभांगी माने, सौ. स्मीता अग्रवाल, सौ. रोहिमी सोलंकर, सौ. कविता बैरागी, सौ. सरला कदम, सौ. अपर्णा मजगे, सौ. प्रियंका भुतडा, सौ. अलका राचट्टे, ललीता व्यास, सौ. पुष्पाली शर्मा, सौ. सारिका दायमा, सौ. तारा पारीक, सौ. कल्पना रामढवे, सौ. अक्षरा खंडेलवाल आदी परीश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *