• Sat. Jun 21st, 2025

नागरिकांनी सतर्क रहावे धोकादायक वस्तूंच्या विक्रीची माहिती मनपा व पोलिसांना द्या

Byjantaadmin

Oct 16, 2023

नागरिकांनी सतर्क रहावे धोकादायक वस्तूंच्या विक्रीची / व्यवसायाची माहिती मनपा व पोलिसांना द्या

 

मनपाच्या शहरातील नागरिकांना सूचना

 

   लातूर/प्रतिनिधी: फिरत्या विक्रेत्यांकडून धोकादायक वस्तू अथवा धोकादायक परिस्थितीत कुठल्याही वस्तूची विक्री / व्यवसाय होत असल्याचे आढळून येत असेल तर नागरिकांनी सतर्क रहावे.या संदर्भात महानगरपालिका व पोलीस प्रशासनास तात्काळ माहिती द्यावी, अशा सूचना मनपाकडून करण्यात आल्या आहेत.

    रविवारी (दि.१५)सायंकाळी शहरातील इस्लामपुरा-तावरजा कॉलनीत फुग्यामध्ये हवा भरताना सिलेंडरचा स्फोट होऊन विक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला तर ११मुले जखमी झाली.या घटनेनंतर मनपाने तात्काळ कार्यवाही करत शहरातील फिरत्या विक्रेत्यां संदर्भात कार्यवाहीच्या सूचना प्रशासनास दिल्या.

   धोकादायक स्थितीत कुठल्याही वस्तूची विक्री / व्यवसाय होत असल्याचे आढळून आल्यास त्यास प्रतिबंध करावा,असे प्रशासनास सुचित केले.यासंदर्भात नागरिकांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे.अशा स्थितीत कुठल्या पदार्थाची विक्री होत असेल किंवा गॅस सिलेंडर सारख्या वस्तू सोबत बाळगून धोकादायक परिस्थितीत व्यवसाय होत असेल तर नागरिकांनी सतर्कता बाळगावी.या संदर्भात महानगरपालिका अथवा पोलीस प्रशासनास तात्काळ माहिती द्यावी. यामुळे भविष्यात घडणाऱ्या दुर्घटना टाळता येऊ शकतील,असे मनपा प्रशासनाने नागरिकांना सुचित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *