वाचन प्रेरणा दिनानिमित्त “रीड लातूर” कडून निबंध स्पर्धेचे आयोजन.
लातूर :–१५ ऑक्टोबर २०२३ हा दिवस माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन असून हा दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो.
या अनुषंगाने “रीड लातूर” उपक्रमाच्या प्रमुख सौ.दीपशिखाताई धिरज देशमुख व आ.धिरज विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून रीड लातूर उपक्रमात सहभागी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
१) मला आवडलेले पुस्तक
२) वाचनाचे महत्त्व
३)वाचाल तर वाचाल
४)पुस्तक माझा मित्र
५) वाचन संस्कृतीचे बदलते स्वरूप असे निबंध स्पर्धेचे विषय असून इयत्ता १ते ४ व इयत्ता ५ ते ८ अशा दोन गटात ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
दोन गटातील प्रथम,द्वितीय व तृतीय विजेत्यांना प्रमाणपत्र, मेडल व रायटिंग बुक असे बक्षीसाचे स्वरूप असून गट एक मधील उत्तेजनार्थ ३ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रायटिंग बुक व गट दोन मधील उत्तेजनार्थ ३ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रायटिंग बुक बक्षीस रूपात दिले जाणार आहे.स्पर्धेसाठी शाळेतून निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांना हा निबंध मराठी किंवा इंग्रजी भाषेत लिहता येईल. इयत्ता १ ते ४ या गटासाठी शब्द मर्यादा २०० ते ३०० एवढी व इयत्ता ५ ते ८ या गटासाठी शब्द मर्यादा ४०० ते ५०० एवढी ठेवण्यात आली असल्याची माहिती “रीड लातूर”चे समन्वयक राजू सी पाटील यांनी दिली आहे.