डॉ.भालचंद्र ब्लड सेंटर, लातूर यांच्यावतीने युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे यांचा सत्कार
निलंगा/प्रतिनिधी रक्तदान शिबिर आोयोजन करणाऱ्या सेवाभावी संस्था व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा कृतज्ञता समारोह समारंभ लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक लातूर येथे दि ८ ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.यावेळी निलंगा येथील राष्ट्रवादी युवक काँग्रसचे शहराध्याक्ष धम्मानंद काळे यांचा डॉ.भालचंद्र ब्लड सेंटर,लातूर येथे पद्मभूषण डॉ अशोक कुकडे काका, डॉ प्रदीप ढेले जिल्हा शल्य चिकीत्सक लातूर,डॉ हरिप्रसाद सोमानी प्रांतपाल,रोटरी क्लब लातूर,लक्ष्मीरमन लाहोठी, डॉ मन्मथ भातंब्रे,डॉ राजेश पाटील,विनोद कुचेरिया,श्रीकांत कर्वा,विशाल लाहोटी यांच्या शुभहस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला .ते निलंगा शहरात अनेक वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतात व गेल्या वीस वर्षापासून स्वत: रक्त दान करतात व प्रत्येक रक्तदान शिबिरात शहरातील व तालुक्यातील अनेकांना रक्त दान करण्यासाठी प्रोत्साहित करतात.एक सामाजिक जाणीव ठेवून प्रत्येक गरजू रुग्णाला रक्त मिळवुन देण्यासाठी सतत अविरत प्रयत्न करत असतात म्हणून त्यांच्या या कार्याची दखल घेउन डॉ.भालचंद्र ब्लड सेंटर,लातूर येथे त्यांना गौरविण्यात आले.यावेळी लातूर जिल्ह्यातील,रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या सेवभवी संस्थांचे पदाधिकारी,जिल्ह्यातील रक्तदान करणारे रक्तंदाते,व मित्र परिवार, डॉ.भालचंद्र ब्लड सेंटर,लातूर येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते