महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे World Pharmacist Day निमित्त संपुर्ण सप्ताह विविध कार्यक्रमाचे आयोजन
निलंगा:-महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथे World Pharmacist Day निमित्त संपुर्ण सप्ताह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .त्यानिमित्त आज निलंगा नगरपरिषद यांच्या सहकार्याने निलंगा शहरात रॅली काढण्यात आली, या रॅलीचे उदघाटन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आला. यावेळी निलंगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेजाळ , प्राचार्य डॉ .बी. एन पौळ व प्राचार्य डॉ .एस. एस पाटील व नगर परिषद अभियंता देवक्तते उपस्थित होते
सुरुवातीस सर्व विद्यार्थ्यांना फार्मसी प्रतिज्ञा देण्यात आली त्यानंतर निलंगा शहरात रॅलीच्या माध्यमातून विविध आरोग्याविषयी तसेच प्लॅस्टिक बंदी कचरा व्यवस्थापन याबद्दल विविध बॅनर व घोष वाक्याद्वारे शहरामध्ये प्रबोधन करण्यात आले.
रॅलीचा समारोप महाविद्यालयात राष्ट्रगीताने करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे आम्हाला रॅलीसाठी सहकार्य मिळाले तसेच नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पण यामध्ये उत्स्फूर्त सहभाग होता. पोलीस प्रशासनातर्फे श्री शिंदे सुधीर , श्री जगताप बाबासाहेब व नगरपरिषद प्रशासनातर्फे श्री वाघमारे विकास पवार विकास यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महाविद्यालयातील D फार्मसी , B फार्मसी व M फार्मसी मधील सर्व विद्यार्थी प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.