• Sat. May 10th, 2025

निलंगा तालुका व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा वाढदिवस संपन्न

Byjantaadmin

Oct 12, 2023
निलंगा तालुका व युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचा वाढदिवस संपन्न
निलंगा-निलंगा तालुका काँग्रेस कमिटी व निलंगा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते,देशाचे माजी गृहमंत्री  आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर  यांचा 88 वा वाढदिवस काँग्रेस कार्यालय अशोक बंगला  येथे माजी नगरसेवक अशोकप्पा शेटकार,शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला.यावेळी निलंगा तालुका अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष लाला पटेल,अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे यांनी चाकूरकर यांच्या जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रा.दयानंद चोपणे म्हणाले की,काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेतृत्व चाकूरकर यांनी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहचवला.निष्ठावंताचे महत्व काय असते चाकूरकर  हे काँग्रेस व गांधी घराण्याचे एकनिष्ठ होते.म्हणून त्यांना पक्षाने लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा देशाचे गृहमंत्री केले तर निलंगेकर साहेब निष्ठावंत होते म्हणून विधानसभा सभागृहाचे कोणतेही नसताना मुख्यमंत्री केले हे एकनिष्ठतेचे फळ आहे.यापुढे निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आदरणीय चाकूरकर साहेब व निलंगेकर साहेब व विलासराव देशमुख साहेब यांचे विचार घेऊन पक्ष मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहीजे.पुन्हा एकदा लातूर जिल्हा काँग्रेस मजबूत करूया गेलेले गतवैभव आणण्यासाठी चाकूरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित कामाला लागू या असे ते म्हणाले.यावेळी माजी नगरसेवक सिराज देशमुख,युवराज मोहोळकर,सोनाजी कदम,नागनाथ घोलप,सेवा दलाचे प्रमोद ढेरे,शेंदचे सरपंच रमेश मोगरगे,जिल्हा उपाध्यक्ष गोविंद सुर्यवंशी,संतोष नाईकवाडे सर,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाडीकर,एनएसयु आय चे प्रसाद झरकर,सोहेल शेख,भवानी नाईकवाडे,बालाजी कांबळे,दिगंबर काळे,सलीम कादरी,महेश चिकराळे,अजय कांबळे,माजी उपनगराध्यक्ष अरविंद कांबळे,प्रकाश गायकवाड,केळगावचे अफसर पटेल इ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *