पंकजा मुंडे (Prakash Ambedkar) भाजपमध्ये अस्वस्थ असल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात. पंकजाताईंना अनेक पक्षांतून ऑफर आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी ) त्यांना बहुजनांसाठी वेगळा पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. आंबेडकर बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते”पंकजा मुंडे सध्या भाजपमध्ये अस्वस्थ आहेत. भाजप बहुजन विचारसरणीचा नाही. पंकजाताईंना त्यांची विचारसरणी मान्य आहे, असे दिसते. जर पंकजा मुंडेंना बहुजनांचा नेता व्हायचं असेल तर आधी त्यांना त्या पक्षातून बाहेर यावे लागेल, मग मला त्यांच्याविषयी बोलता येईल. त्यांना काही सल्ला द्यायचा असेल तर तो त्यांना वैयक्तिक देईल, जाहीररित्या सल्ला कसा देऊ, असे आंबेडकर म्हणाले. “पंकजा मुंडे बहुजनांच्या नेत्या असतील, तर बहुजनांसाठी वेगळा पक्ष काढतील,” असे ते म्हणाले.
“राज्य सरकार पूर्णपणे गोंधळलेले आहे. मुख्यमंत्र्यांचा एक आदेश तर उपमुख्यमंत्र्यांचा वेगळा आदेश असतो. विरोधकांवरbjp धाडी घालायला नव्याने सुरुवात केली आहे. मणिपूर, गुजरातमध्ये जे घडले ते पुन्हा घडण्याची शक्यता आहे, अशी भीती आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.”पाच राज्यांत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस,ncp शिवसेना (ठाकरे गट) एकत्र लढत आहेत असे सांगतात. आघाडी सरकार जाऊन वर्ष झाले तरी यांच्यात जागावाटपाचे ठरले नाही. सरकारमध्ये जे सुरू आहे, तेच राजकारणात चालले आहे,” असे आंबेडकर म्हणाले.