• Sat. May 10th, 2025

पटोले, वडेट्टीवार यांच्यासमोरच काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राडा

Byjantaadmin

Oct 12, 2023

नागपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आज चव्हाट्यावर आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासमोरच दोन्ही गट भिडले. प्रदेशाध्यक्षांसमोरच एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत हाणामारी झाली. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या वेळी व्यासपीठावर होते. भाषण करण्याच्या मुद्द्यावरून वाद झाल्याचे समजते. नागपूर येथे काँग्रेसमधील बैठक आयोजित केली होती. या बैठकीत माईकवर भाषण करण्यावरून वाद झाला. वादानंतर पदाधिकारी एकमेकांसमोर उभे ठाकले. दोन गटात हाणामारी झाली. स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादामुळे हा प्रकार झाल्याचे समजते.नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि नरेंद्र जीचकार यांच्यात शाब्दीक वादावादी झाली. यावेळी व्यासपीठावर पटोले, वडेट्टीवार उपस्थित होते. दोन्ही नेत्यांना पदाधिकाऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याचे मनस्थितीत नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *