केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Rajasthan Assembly Election) मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी या आधी 23 नोव्हेंबर रोजी मतदान (Voting Date For Rajasthan Assembly Election) होणार होते. आता, त्यात बदल झाला असून 25 नोव्हेंबर रोजी मतदान (Voting Day) होणार आहे. मतदानाची तारीख बदलण्याची मागणी राजस्थानमधून (Rajasthan) करण्यात येत होती. धार्मिक कार्यक्रम आणि विवाह सोहळा आयोजित होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने सोमवारी राजस्थानसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान पाच राज्यांमध्ये मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजस्थानमधील अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी 23 नोव्हेंबरबद्दल चिंता व्यक्त केली होती.23 नोव्हेंबर रोजी अनेक विवाह सोहळे आहेत. त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. अनेकांना मतदान करता येणार नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
Revised schedule for the General #Election to the Legislative Assembly of #Rajasthan
✅ Date of poll in Rajasthan : 25th November, 2023 ( Saturday )#ECI #AssemblyElections2023 pic.twitter.com/Ba6oqKYwMd
— Election Commission of India (@ECISVEEP) October 11, 2023
निवडणूक आयोगाने सांगितले की, “मतदानाच्या तारखेत बदल करण्याबाबत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि माध्यमांच्या मार्फत मागणी करण्यात येत होती. मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लग्नसराई पार पडणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गैरसोय होऊ शकते. मतदानादरम्यान मतदारांचा सहभाग कमी होऊ शकतो. त्यामुळे मतदानाची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.
दरम्यान, गेल्या 25 वर्षात भाजप मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा नसताना पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. त्याचबरोबर सत्ताधारी काँग्रेस मुख्यमंत्री गेहलोत यांच्याऐवजी सामुहिक नेतृत्त्वात निवडणूक रिंगणात उतली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि अशोक गेहलोत हे पक्क समीकरण झालं आहे. तरिदेखील गेहलोत यांच्या नेतृत्त्वात निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय काँग्रेसनं नेमका का घेतला? याबाबत अनेक तर्कवितर्क सध्या राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली असून दुसरीकडे काँग्रेसच्या यादीकडे लक्ष लागले आहे.