• Wed. May 7th, 2025

शामीला संधी नाहीच, चाहत्यांचा राग अनावर, विश्वचषकातील हॅट्ट्रिकची करुन दिली आठवण

Byjantaadmin

Oct 11, 2023

भारतीय संघाचा विश्वचषकातील दुसरा सामना दिल्लीमध्ये सुरु आहे. अफागणिस्तान आणि भारत (IND vs AFG) यांच्यामध्ये ही लढत सुरु आहे. या सामन्यात भारतीय संघामध्ये एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. आर. अश्विन (R Ashwin याच्या जागी शार्दूल ठाकूर (Shardul) याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. सामन्याआधी मोहम्मद शामी (mohammed shami) याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अफगाणिस्तानविरोधात मोहम्मद शामीचा रेकॉर्ड चांगला आहे. 2019 च्या विश्वचषकात शामीने हॅट्ट्रिक घेतली होती. त्यामुळे आज शामीला संधी मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण शार्दूल ठाकूरसोबत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. टीम मॅनेजमेंटच्या यानिर्णायानंतर भारतीय चाहत्यांना राग अनावर आला. नेटकऱ्यांनी भारतीय संघ आणि बीसीसीआयवर निशाणा साधला.

icc odi world cup 2023 match 9 ind vs afg mohammed shami in not in playing xi angry fans reminded of hat trick wickets against afghanistan शामीला संधी नाहीच, चाहत्यांचा राग अनावर, विश्वचषकातील हॅट्ट्रिकची करुन दिली आठवण

 

2019 च्या विश्वचषकात मोहम्मद शामी याने भेदक मारा केला होता. अफगाणिस्तानविरोधात शामीने हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. माजी भारतीय गोलंदाज चेतन शर्मा यांच्यानंतर विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा शामी दुसरा गोलंदाज आहे. शामीने ही हॅट्ट्रिक अफगाणिस्तानविरोधात घेतली होती. शामी संघात असता तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढला असता. आजच्या सामन्यात शामीला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळेल, अशी आशा होती. पण टीम मॅनेजमेंट आणि रोहित शर्मा यांनी शार्दूल ठाकूरला संधी दिली. त्यानंतर चाहत्यांमध्ये रोष पाहायला मिळाला.

शार्दूलला संधी – 

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक गमावली. दिल्लीच्या खेळपट्टीवर भारतीय संघाला प्रथम फिल्डिंगसाठी उतरावे लागले. भारतीय संघात एक बदल करण्यात आला. शार्दूल ठाकूर याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले तर अश्विनला आराम दिला. त्यानंतर मोहम्मद शामीच्या चाहत्यांचा राग अनावर आला. चाहत्यांनी रोहित शर्मासह टीम इंडियावर निशाणा साधला.

https://twitter.com/itzSekar/status/1712020168254050326?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1712020168254050326%7Ctwgr%5E1103e5f9fa9313f9731d974da22103c587306998%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Ficc-odi-world-cup-2023-match-9-ind-vs-afg-mohammed-shami-in-not-in-playing-xi-angry-fans-reminded-of-hat-trick-wickets-against-afghanistan-1217673
https://twitter.com/VibhuBhola/status/1712016764551524692?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1712016764551524692%7Ctwgr%5E1103e5f9fa9313f9731d974da22103c587306998%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Ficc-odi-world-cup-2023-match-9-ind-vs-afg-mohammed-shami-in-not-in-playing-xi-angry-fans-reminded-of-hat-trick-wickets-against-afghanistan-1217673
https://twitter.com/Anil_Kumar_ti/status/1712034960570458562?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1712034960570458562%7Ctwgr%5E1103e5f9fa9313f9731d974da22103c587306998%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Ficc-odi-world-cup-2023-match-9-ind-vs-afg-mohammed-shami-in-not-in-playing-xi-angry-fans-reminded-of-hat-trick-wickets-against-afghanistan-1217673

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *