• Wed. May 7th, 2025

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूसत्र सुरूच

Byjantaadmin

Oct 11, 2023

काही दिवसांपूर्वी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ४८ तासांत सुमारे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये काही नवजात बालकांचाही समावेश होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं. विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर विविध आरोप केले. रुग्णालयात औषधांची कमतरता असल्याने संबंधित मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. पण रुग्णालयात औषधांची कमतरता नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. असं असलं तरी गेल्या आठ दिवसांत याच रुग्णालयात एकूण १०८ जणांचा मृत्यू झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या आठ दिवसात सुमारे १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत एका अर्भकासह ११ रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृत्यूबद्दल भाष्य करताना रुग्णालयाचे डीन श्याम वाकोडे यांनी, रुग्णालयात औषधांचा तुटवडा नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत रुग्णालयाचे डीन श्याम वाकोडे म्हणाले, “गेल्या २४ तासांत आम्ही ११०० हून अधिक रुग्णांची तपासणी केली. यातील १९१ नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल केलं. यापूर्वी २४ तासांत सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत होता. ही संख्या आता ११ वर आली आहे. संबंधित मृतांमध्ये जन्मत: विकार असलेल्या बालकांचा समावेश आहे.”

आम्ही पुरेशी औषधे साठवून ठेवली आहेत. तसेच वैद्यकीय कर्मचारी सर्व रुग्णांना मदत करत आहेत. औषधांच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला,” असंही रुग्णालयाचे डीन म्हणाले. दरम्यान, मंगळवार CONGRESS ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्रीASHOK CHAVHAN यांनी सांगितलं की, NANDED येथील शासकीय रुग्णालयात नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ६० हून अधिक अर्भकांना दाखल करण्यात आलं होतं. परंतु बाळांची काळजी घेण्यासाठी फक्त तीन परिचारिका कार्यरत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *