ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
लातूर- महाराष्ट्रात इतर समाजाने आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलने सुरु केले आहेत त्यामुळे लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील हिंदू लिंगायत या जातीस अन्य मागास वर्ग आयोगाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरण क्रमांक 32/ 2014 मधील उर्वरित जातीचा त्वरित ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा यासाठी आज धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवा अखिल भारतीय वीरशः लिंगायत युवा संघटनेच्या वतीने करण्यात आले.
लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिवा अखिल भारतीय वीरसे व युवा संघटनेच्या वतीने ओबीसी आज धरणे आंदोलन करण्यात येत असून धरणे आंदोलन करून आम्हाला न्याय नाही मिळाला तर येणार्या सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवा संघटनेच्या वतीने प्रचंड असा धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिवा संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य दत्ताभाऊ खंकरे यांनी बोलताना सांगितले.
या धरणे आंदोलनात उमाकांत शेटे,दत्ताभाऊ खंकरे,सुभाष आप्पा मुक्ता,गणेश कारभारी, आनंदअप्पा खकारे, उमाकांत अनारर्गट्टे,ओमकार औराद, सुमित पारुडकर, रितेश राचट्टे,चंद्रकांता वैजापूरे, दिलीप अण्णा कत्ते,अंतेश्वर तोडकरी, विलास खिंडे,बालाजी पाटील नेत्रगावकर, राजकुमार बिरादार बामणीकर, विश्वनाथ बिरादार कौलखेडकर गणेश कारभारी, अनिल सोनटक्के,संजय देशमुख, प्रकाश मरतुळे जळकोट ,युवराज बिराजदार देवणी ,महेश पाटील वलांडीकर महादेव आप्पा कल्याणी अहमदपूर राम भातंबरे देवणी ,दादा पांडे रति कांत स्वामी ओमकार रटकलकर,महादेव आप्पा लामतुरे जगन्नाथ अप्पा कोळंबे, नागनाथ बिराजदार बामणीकर, शिवदास गंगापुरे, शरद चौधरी रेणापूरकर,कल्पनाताई बावगे,स्वरूपा स्वामी, शिवनंदा दोनाई,मीरा दामा, विनायादेवी बिराजदार, विमल शेटे, सरस्वती काळगापुरे, संगीता शेटे, मीनाक्षी मुंदडा,वर्षा दंडे, सुमन राऊत, आधी सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.