• Wed. May 7th, 2025

विकासकामांत औसा मतदारसंघ राज्यात अव्वल : आ. अभिमन्यू पवार

Byjantaadmin

Oct 11, 2023
विकासकामांत औसा मतदारसंघ राज्यात अव्वल : आ. अभिमन्यू पवार
४४ कोटींच्या ६ रस्ते कामांचा शुभारंभ
औसा (प्रतिनिधी):-कालच मतदारसंघातील निलंगा सर्कलमध्ये ५७ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ झाल्यानंतर आज औसा तालुक्यातील ४४ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ होतोय एकंदरीत औसा मतदारसंघातील औसा व निलंगा सर्कल मधील विकासाचे समतोल गाणित मांडले आहे. यामधून या चार वर्षांची आकडेवारी पाहिली तर औसा विधानसभा मतदारसंघात सुमारे १ हजार कोटींच्या जवळपास निधी मंजूर झाला असून राज्यात औसा मतदारसंघ विकासात अव्वल स्थानावर असेल अशी ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली. सोमवार.९) रोजी औसा  लामजना पाटी जावळी मुगळेवाडी अपचुनदा – – – बेलकुंड देवताळा, मातोळा हसलगण, लिंबा दाऊ बाणेगाव तळणी किल्लारी, पारधेवाडी- कार्ला, जवळगा पोमादेवी लिंबाळा गुबाळ – या ४४ कोटी रुपयांच्या ६ रस्ते विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अभिमन्यू पवार पुढे म्हणाले, औसेकरांना सुखर जीवन कसे जगता येईल यासाठी तुमचा आमदार म्हणून माझा हा प्रयत्न आहे. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही आमदार केले म्हणून तुमचा सेवक म्हणून मी काम करीत आहे. आमदार होण्याअगोदर मी करीत असलेल्या कामाची दखल घेऊन राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री राहतील या अपेक्षेने मला तुम्ही आमदार केले. पण देवेंद्रजी मुख्यमंत्री असतील किंवा नसतील मी मंत्री असेल किंवा नसेल तरीही तुमचा आमदार म्हणून देवेंद्रजींच्या आशीर्वादाने मतदारसंघात विकासकामे झपाटयाने पूर्ण होत आहे. औसा शहरासाठी निम्न तेरणा धरणातून ४५ कोटींची पाणीपुरवठा योजना
दिल्ली वा योजनेतून आज शहराला पाणीपुरवठा होत आहे. याससह ३० खेडी योजनेला २८ कोटी रुपये खर्चून हि योजना पुनर्जीवित करण्यात आली तर १० खेडी व ६ खेडी या योजनाही लवकरच मार्गी लागतील. मतदारसंघातील विविध गावांच्या विकास कामांसाठी १ हजार कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये विशेषता आशीव मातोळा – किल्लारी सांगवी नणंद- निलंगा व छत्रपती शिवाजी महाराज चौक लामजना पाटी ते माहात्मा बसवेश्वर चौक लातूर या ८५.३ किलोमीटर लांबीच्या या रस्ते कामासाठी ८५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच हे काम सुरू होईल. औसा येथे शासकीय निवासस्थानासाठी १५ कोटी, औसा येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून याठिकाणी १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयकामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता मिळाली असून उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी ६५ कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यासह औसा तहसील व प्रशासकीय इमारत वरचा मजला बांधकाम, ५५ गावात तलाठी भवन, गरिब समाजातील मुलीसाठी १८/१८ कोटीचे वस्तीगृह, औसा शहरात १४ सार्वजनिक शौचालये आदी कामासाठी निधी मंजूर झाला असल्याचे सांगून बेलकुंडचा मारूती महाराज व किल्लारी हे दोन्ही साखर कारखाने माझ्या हस्तक्षेपामुळे आज सहकारी तत्त्वावर शेतकऱ्यांच्या मालकीचे राहिले असल्याचे त्यांनी सांगितले. मंचावर भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण उटगे,रमेश वळके, प्रवीण कोपरकर, युवराज बिराजदार, विकास नरहरे, प्रा सुधीर पोतदार, संजय कुलकर्णी, तुराब देशमुख, राजकिरण साठे, मोहन कावळे, सदाशिव जोगदंड, बांधकाम विभागाचे उपअभियंता रोहन जाधव, शाखा अभियंता हानमंते, शाखा अभियंता साठे, तोटे, मुळजकर, सरपंच विष्णू कोळी, सचिन पवार, गोविंद भोसले, गणेश भोसले, दत्ता भोसले आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *