सिराज तांबोळी यांना शिक्षकरत्न पुरस्कार
निलंगा : निलंगा तालुक्यातील बुजरूवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले सिराज तांबोळी यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा निलंगा यांच्या वतीने शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निलंगा गटशिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या यशाबद्दल तांबोळी यांचे कौतुक होत आहे. विविध उपक्रमांद्वारे सिराज तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक देण्याचा प्रयत्न केला. या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.