उमरगा हाडगा येथे शालेय विद्यार्थी यांनी तीन तास बस थांबवून केले रस्ता रोको आंदोलन
निलंगा (प्रतिनिधी)मौजे उमरगा हाडगा येथील शालेय विद्यार्थी यांनी परिवहन महामंडळाच्य एसटी नियोजनाच्या विरोधात तब्बल तीन तास रस्ता रोको आंदोलन केले मौजे उमरगा येथील शंभर पेक्षा जास्त विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी निलंगा शहरातील काँलेज ला जात असतात परंतु संकाळी 8.वाजता लातूर वरून तुपडी मार्ग येणारी बस हि पुर्ण क्षमतेने भरून येते यामुळे हाडगा व उमरगा येथील पास धारक विध्यार्थी यांचे शालेय व आर्थिक नुकसान होत आहे व लातूर वरून संकाळी 8.30 वाजता मसलगा राठोडा गौर मार्ग हि बस उमरग्यात येते हि पण बस पुर्ण क्षमतेने भरून येते व कधी कधी जागा शिल्लक असताना पण एसटी चालक हे उमरगा येथे बस थांबवत नाहीत बस हि विद्यार्थी यांच्या आगांवर आल्यासारखे करून कट मारुन बस पुढेच घेऊन जातात या गैरवर्तन करणारे चालक यांना समझ द्यावे नाही तर यामुळे मोठा अनर्थ घडु शकतो यामुळे उमरगा येथे संकाळी येणाऱ्या तुपडी मार्ग व राठोडा मार्ग येणाऱ्या कोणत्याही बस या उमरगा गावात थांबत नाहीत यामुळे आज या गैर नियोजनाला उमरगा येथील विध्यार्थी व ग्रामस्थ यांनी बस थाबवून तिव्र आंदोलन केले आहे काही दिवसांपूर्वी उमरगा हाडगा येथे बस थांबत नाही म्हणून एसटी आगर प्रमुख यांना लेखी व तोडी माहिती विद्यार्थी व पालक यांनी दिली होती पण यांची कोणत्याही प्रकारची दखल आगार प्रमुख निलंगा यांनी घेतली नाही या मुळे निलंगा लातूर मार्ग शालेय विध्यार्थी व पालक यांनी तबल तीन तास रोकोन धरले होते आंदोलनाची परिस्थिती तिव्र होत चाली होती तात्काळ आंदोलन घटनास्थळी निलंगा पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक शेजाळ यांनी भेट देऊन आगर प्रमुख यांना बोलवून घेऊन विध्यार्थी यांची गैरसोय व शालेय आर्थिक नुकसान होणार नाही यांची आपल्या महामंडळ विभागाने नियोजन करावे असे मागणी केली यामुळे हे चालू झालेले आंदोलन एसटी आगर प्रमुख यांचे प्रतिनिधी यांनी उद्या पासून विद्यार्थी यांची गैरसोय व शालेय नुकसान होणार नाही असे वचन विध्यार्थी यांना दिले.यामुळे हे आंदोलन विध्यार्थी यांनी स्थगित केले या मध्ये गावातील तटामुंक्ती अध्यक्ष जगदीश लोभे भाजपा विध्यार्थी आघाडी चे तालुका अध्यक्ष नयन माने गावचे नागरिक विलास लोभे अजित लोभे चेअरमन आत्माराम लोभे रमेश वामन लोभे गावच्या बचत गटाच्या प्रमुख पल्लवी गायकवाड गावचे पालंक व विध्यार्थी संघटना चे पदअधिकारी यांनी यापुढे जर का एसटी बस थांबत नसेल तर तिव्र आंदोलन करू असे इशारा एसटी महामंडळ यांना दिला आहे.