महाराष्ट्र महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक
निलंगा- केंद्रीय विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय योग्यता चाचणी द्वारे सप्टेंबर २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय प्रवेश परीक्षेत महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील हिंदी विभागातील योगिता शिरूरे , भरत बैरागी व अब्बास दाळींबकर या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठ, गुलबर्गा (कर्नाटक) येथे एम.ए. हिंदी विषयात प्रवेश मिळविला. या विद्यार्थ्यांना डॉ. गोविंद शिवशेट्टे यांनी मार्गदर्शन केले .
विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय शिवाजीराव पाटील साहेब, संस्था सचिव बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके आदी मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. मान्यवरांनी महाविद्यालयाच्या विशेषतः हिंदी विभागातील या यशस्वीतेबद्दल हिंदी विभागाचे कौतुक केले. या प्रसंगी डॉ. धनंजय जाधव, हिंदी विभागप्रमुख डॉ. बालाजी गायकवाड , डॉ. गोविंद शिवशेट्टे, डॉ. विजयकुमार कुलकर्णी व डॉ. मुस्तफा मुल्ला आदी उपस्थित होते.