जिल्हा रुग्णालयाची जागा लवकरच उपलब्ध होणार स्वतेंत्र सोयाबिन संशोधन केंद्र लातूरला द्या उपोषणस्थळी भेट देऊन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी साधला संवाद
लातूर -मंजूर असलेल्या जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असणारी कृषी विभागाची जागा आरोग्य विभागाला मिळण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून लवकरच ही जागा उपलब्ध होर्ईल व जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल. यासाठी माझ्यासह माझे सर्व सहकारी प्रयत्न करीत असल्याचे आश्वासन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शनिवारी येथे बोलताना दिले.
ते लातूर येथील माझं लातूर परिवाराच्या वतीने महात्मा गांधी चौक येथे २ ऑक्टोंबर पासून जिल्हा शासकीय रुग्णालयाचा प्रश्न सुटावा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चे खाजगीकरण रद्द करावे, सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला व्हावें या मागण्यासाठी साखळी उपोषण सुरू केले आहे त्या ठिकाणी शनीवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी भेट दिली तेव्हा त्यांनी उपस्थित पदाधिकारी व लोकांशी संवाद साधला त्यावेळीं ते बोलत होते
यावेळी राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअमन गणपतराव बाजूळगे, संभाजी सुळ, संभाजी रेड्डी, सुपर्ण जगताप, शिवाजी कांबळे, पंडित कावळे, चांदपाशा इनामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाब्दिक सहानभुती नव्हे तर आम्ही प्रयत्न करतोय आपल्या मागण्या रास्त माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची माहिती
माझं लातूर परिवाराच्या वतीने लातूरकरांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या घेऊन उपोषण केले जात आहे. या सर्व मागण्यांना काँग्रेस पक्षाचा पुर्ण पाठींबा आहे, असे नमुद करुन माजी मंत्री दिलीपराव देशमुख पुढे म्हणाले की जिल्हा रुग्णालयाच्या आवश्यक जागेचा प्रश्न अंतीम टप्प्यात आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करुन नये जर खाजगीकरण होणारच असे तर मात्र या हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी काही खाटा राखीव ठेवायला हव्यात तसेच सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला होणे हा लातूरचाच हक्क आहे. ते इतर ठिकाणी गेले म्हणून सर्व संपले असे नाही तर स्वतंत्र सोयाबीन संशोधन केंद्र लातूरला द्या संशोधनात स्पर्धा असली पाहिजे. देवणी गोवंश संवर्धन केंद्रही लातूर येथेच झाले पाहिजे. हे प्रश्न योग्य आणि रास्त आहेत. ते सुटले पाहिजेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरुही केले आहेत. केवळ शाब्दीक सहानुभूती नाही तर प्रयत्नही केले जात आहेत, असेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. लक्ष्मणराव मोरे, प्रा. डॉश्रीकांत गायकवाड अॅड. देविदास बोरुळे- अविनाश बट्टेवार, पवनकुमार गायकवाड, फारुक शेख, राजू गवळी, प्राचार्य एकनाथ पाटील, सिकंदर पटेल, असलम शेख, अभिषेक इगे, कलीम शेख, स्वाती जाधव, सतीश पाटील वडगावकर, करीम तांबोळी तसेच माझं लातूर परिवाराचे दीपरत्न निलंगेकर, डॉ. सीतम सोनवणे, संजय जेवरीकर, अभय मिरजकर, सतीश तांदळे, उमेश कांबळे, प्रदीप मोरे, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.