आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापुरात आल्यानंतर त्यांची तोफ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर बरसली आहे. ज्यावेळी शरद पवार हे पक्षाच्या केंद्रस्थानी होते. त्यावेळी त्यांना सर्व आलबेल वाटत होते, पण शरद पवारांकडे आता पक्ष राहिलेला नाही. अजित पवार यांना भविष्यात आणखी समर्थन मिळेल. जो पक्ष सांभाळेल, त्यांच्यासोबत नेते जातील, अशी टिप्पणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. महाराष्ट्रात लोकसभा प्रवास उपक्रम सुरू केला आहे. लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आमचा उपक्रम आहे. संपर्क ते समर्थन असा आमचा प्रवास आहे. जनता आम्हाला समर्थन देत आहे, याचं समाधान आहे. निवडणूक जवळ येईल तसे आम्हला आणखी समर्थन मिळेल आणि आमचा विजय होईल, असा विश्वासहीbawankule यांनी व्यक्त केला.प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. bjpच्या नेत्यांना वाटतं की मुख्यमंत्री devendra fadnvis व्हावेत. आमच्या केंद्रीय समितीने जर सांगितले की पुढेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील, तर आम्हाला काम करावेच लागेल. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काही दिले नाही, त्यामुळेच आज एकनाथ शिंदे देतात, तर नेते त्यांच्याबरोबर राहतील, असेही बावनकुळे म्हणाले.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांनाही बारामतीला बोलावले होते, पण त्याचा पवार यांना फारसा उपयोग झाला नाही. आतादेखील राहुल गांधी यांना बारामतीला आणले तरी फारसा उपयोग होणार नाही, असा टोलाही शरद पवार यांना बावनकुळे यांनी लगावला.