उज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे उज्वला योजनेतील १० कोटी ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या सबसिडीत पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे आता उज्वला योजनेंतर्गत असलेल्या नागरिकांना आता फक्त ६०० रूपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, उज्वला योजनेंतर्गत ३०० रूपये गॅस सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे आता सिलेंडर आता ६०० रूपयांना मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. केंद्र सरकारने याआधी २९ ऑगस्टला महत्त्वाची घोषणा केली होती. त्यावेळी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी कमी केले होते. आगामी 5 राज्य विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे निर्णय घेण्यात आल्याचे चर्चा होत आहे.