मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज सकाळी कारचा आणि अज्ञात वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. यात तिघे जण गंभीर असून एक जण किकोळ जखमी आहे. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बोरघाटाजवळ सुटले, हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, यात एका अज्ञात वाहनाला कारची जोरदार धडक बसली यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी प्रवाशांना तात्काळ नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतुकीवरही अल्पसा परिणाम झाला होता.
- अब्दुल रहमान खान, अनिल सुनिल सानप, वसीम साजिद काझी,राहुल कुमार पांडे, आशुतोष नवनाथ गांडेकर, अशी मृताची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघातीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भीषण होता की गाडीतील मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी गाडीला कापत सर्वांना बाहेर काढावे लागल्याची माहिती प्रत्यक्षर्शनी दिली आहे.
चालक मच्छिंद्र आंबोरेंसह अजून दोघे जण गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. यात अमीरउल्ला चौधरी आणि दिपक खैराल यांचा समावेश आहे. तर अस्फीया रईस चौधरी सुद्धा किरकोळ जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
गुरूवारी रात्रीची घटना
गुरवारी रात्री 11वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान हा अपघात झाला. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी यावेळी मदत कार्य केले. हा अपघात खोपोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत झाला असून अपघात स्थळे खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, पोलिस निरीक्षक शिरीष पवार, पोलिस उपनिरीक्षक योगेश भोसले इत्यादीने या अपघाताची चौकशी सुरू केली आहे.