• Wed. Apr 30th, 2025

नांदेड:365 दिवसांत 3500 मृत्यू‎!

Byjantaadmin

Oct 4, 2023

मराठवाड्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या‎ नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव‎चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि‎रुग्णालयात वर्षभरात उपचारादरम्यान‎साडेतीन हजारावर रुग्णांचा मृत्यू होतो, अशी ‎धक्कादायक माहिती समोर आली आहे.‎

नांदेड, परभणी, हिंगोली यासह‎ तेलगंणातील रुग्ण येथे उपचारासाठी दाखल‎ होतात. जवळपास ५०० खाटांचे हे रुग्णालय‎आहे. मात्र सद्य:स्थितीत १२०० रुग्ण उपचार‎घेत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून‎नांदेडमध्ये हे रुग्णालय उभारण्यात आले‎आहे. मात्र येथे सुविधांचा अभाव दिसून येतो.‎ त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाणही सर्वाधिक‎दिसून येते. दररोज शेकडोच्या संख्येने रुग्ण‎भरती होतात. दरम्यान, सप्टेंबर (२०२३)‎महिन्यात ६ हजार ८९४ रुग्ण (ॲडमिट)‎दाखल झाले होते. तर, ३० सप्टेंबर या एका‎दिवशी ११७८ रुग्ण ओपीडीत आले होते. या‎ठिकाणी डेंग्यू, मलेरिया यासोबतच विषबाधा,‎सर्पदंश, अपघात, हृदयविकार, मनोरुग्ण,‎महिलांचे विविध आजार, प्रसूती आदी सर्व‎प्रकारचे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. या‎ठिकाणी सीटी स्कॅन मशीन एक्स-रे मशीन‎यासह इतर आवश्यक असलेले तपासणी‎मशीन बंद आहेत. तसेच औषधांचा तुटवडा,‎वाॅर्डमधील डॉक्टर लक्ष देत नाही, असा‎आरोप नातेवाइकांमधून केला जातो. प्रत्येक‎गोष्ट नातेवाइकांना बाहेरून आणावी लागते.‎वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्ण‎दगावतात. दररोज १४ ते १६ रुग्णांचा मृत्यू‎होतो. या वर्षभरात साडेतीन हजारांवर रुग्णांचा‎मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील आरोग्य‎प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.‎

चौकशी करण्यासाठी आलेली तज्ज्ञांची‎ समिती, आमदार, खासदार आणि मंत्र्यांचे ‎दौरे यामुळे रुग्णालय प्रशासनाची लगबग ‎तर सलग दुसऱ्या दिवशीही सात रुग्णांचा‎ मृत्यू झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या‎ नातेवाइकांची वाढलेली चिंता असे चित्र‎मंगळवारी नांदेडच्या डॉ. शंकरराव‎चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व‎रुग्णालयात होते, तर रुग्णालयात‎दिवसभर मोठ्या प्रमाणात पोलिस‎बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.‎छत्रपती संभाजीनगर येथून वैद्यकीय‎तज्ज्ञांची समिती येणार असल्याने‎रुग्णालय प्रशासनाकडून प्रत्येक वाॅर्डात‎पुरेसे डॉक्टर आणि नर्स उपलब्ध करून‎देण्यासाठी लगबग सुरू होती.‎

रुग्ण वाचवण्याचा प्रयत्न‎

या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण‎अधिक आहे. यात रेफर झालेले रुग्ण‎सर्वाधिक असतात. दाखल होतानाच‎ते अत्यवस्थ असतात. आमचा‎रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न असतो.‎वेळप्रसंगी बाहेरून औषधे उपलब्ध‎करून दिल्या जातात. परंतु,‎उपचारास रुग्णांचा प्रतिसाद मिळत‎नाही. ते मृत पावतात. वर्षभरात‎जवळपास साडेतीन हजारांवर‎रुग्णांचा मृत्यू झाला आहे.‎ – डॉ. गणेश मनूरकर, वैद्यकीय अधीक्षक.‎

छायाचित्रणास मनाई

‎रुग्णालयाच्या परिसरात आणि वॉर्डात‎छायाचित्रण करण्यास मनाई करण्यात‎येत होती. इथे नियुक्त खासगी सुरक्षा‎रक्षक पत्रकारांना थांबवत होते. वरिष्ठ‎अधिकाऱ्यांची परवानगी घ्या आणि‎नंतरच फोटो घ्या, असे ते सांगत होते.‎तर वाॅर्डात पाणी उपलब्ध करून द्या‎म्हणून अनेक नातेवाईक डॉक्टर आणि‎सुरक्षा रक्षकांनाही विनंती करत होते.

ही आहेत ‎मृत्यूची‎ कारणे‎

उपचारास विलंब :‎आधीच अत्यवस्थ रुग्ण येथे‎येतात त्यात अनेकदा त्यांना बेड‎मिळत नाही. प्रकृती बिघडते.

औषधांचा तुटवडा : ‎बाहेरुन औषधी आणण्यास सांगते.‎अनेकांची खर्च करण्याची क्षमता‎ नसते. परिणामी मृत्यू वाढतात.‎

मनुष्यबळाचा अभाव :‎ डॉक्टर, नर्स व स्वच्छता कर्मचारी‎यांची संख्या अपुरी आहे. त्याचा‎परिणाम आरोग्य सुविधांवर होतो.

बंद असलेली उपकरणे :‎सीटी स्कॅन, एक्स रे ही यंत्रे अनेक‎दिवसांपासून बंद आहेत. नवजात‎शिशू कक्षातील काही वार्मरही बंद.‎

७० परिचारिकांची बदली;‎दुसऱ्या बदलून येईनात

‎‎विष्णुपुरीतील रुग्णालयात‎ परिचारिकांच्या १५० तर स्वच्छता‎कर्मचाऱ्यांची ७० पदे रिक्त आहेत.‎त्यामुळे रुग्णांना सेवासुविधा मिळण्यात‎अडथळा निर्माण होतो. डॉ.शंकरराव‎चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि‎रुग्णालयात एकूण २० विभाग आहेत.‎यात नुकतेच प्राध्यापक, सहायक‎प्राध्यापक यांचे ५४ पदांची भरती‎करण्यात आली आहे. या ठिकाणी १०४‎निवासी डॉक्टर तर २७४ परिचारिका‎आहेत. दरम्यान, ७० परिचारिकांची‎नुकतीच बदली करण्यात आली.‎त्यांच्या जागेवर दुसऱ्या परिचारिका रुजू‎होणे बाकी आहे.‎

नातेवाइकांचा वाढला रोष‎

वाॅर्ड क्रमांक ३४ च्या समोर असलेल्या‎पॅसेजमध्ये सकाळी १०.३० वाजेच्या‎सुमारास काही कर्मचारी स्वच्छता करत‎होते. गेली ८ दिवस यांना अनेक वेळा‎सांगूनही यांनी स्वच्छता केली नाही, आज‎मात्र मंत्री येणार असल्यामुळे हे स्वच्छता‎करत आहेत, यांना रुग्णांची काळजी आहे‎का? अशा शब्दात एक वृद्ध महिला‎आपला संताप व्यक्त करत होती.‎

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed