पुणे ते नागपूर अशी सुमारे 800 किमी पायी ‘युवा संघर्ष यात्रा’ काढत आहे. यादरम्यान राज्यातील युवांशी संवाद साधता येणार आहे. ही युवा संघर्ष यात्रा कुणाची व्यक्तिगत नाही तर तमाम युवा आणि विद्यार्थ्यांची असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या या यात्रेकडे पाहिले जात आहे.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी स्वत: माहिती दिली आहे. मात्र, या यात्रेचा राहुल गांधी यांच्या भारत जोडो योत्रेशी काहीही संबंध नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजप सोबत सरकारमध्ये समावेश करण्याचा होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमदार रोहित पवार हे चांगलेच आक्रमक आणि सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. आमदार रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांची जागा घेण्याची इच्छा असल्याचा आरोपही झाला होता. त्यामुळे आता या यात्रेकडे त्याच दृष्ट्रीकोणातून पोहिले जात आहे.
काय म्हणाले रोहित पवार
राज्यात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत युवांची संख्या सर्वाधिक असूनही त्यांच्या प्रश्नांकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. बेरोजगारी, पेपरफुटी, कंत्राटी भरती, शाळांचं खासगीकरण, निवड झालेल्यांना नियुक्त्या न देणं, शिष्यवृत्ती वेळेवर न मिळणं असे युवा आणि विद्यार्थ्यांचे अनेक मुद्दे आहेत. विधानसभेपासून रस्त्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी हे मुद्दे मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला तरीही सरकारकडून न्याय दिला जात नाही. त्यामुळे या मुद्द्यांवर 25 ऑक्टोबर रोजी पुणे ते नागपूर अशी सुमारे 800 km पायी ‘युवा संघर्ष यात्रा’ काढत आहे. यादरम्यान राज्यातील युवांशी संवाद साधता येणार आहे. ही ‘युवा संघर्ष यात्रा’ कुणाची व्यक्तिगत नाही तर तमाम युवा आणि विद्यार्थ्यांची आहे. त्यांच्या प्रश्नांवर आज मार्ग निघाला नाही तर उद्या त्यांचे भविष्य अंधकारमय होणार आहे. त्यामुळं आजच्यासाठी आणि उद्यासाठीही युवा आणि विद्यार्थ्यांनी या यात्रेत सहभागी व्हावं, असं माझं आवाहन आहे.