मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची महाप्रबोधन यात्रेला पु्न्हा सुरूवात होणार आहे. प्रबोधन यात्रेला 14 ऑक्टोबरपासून सुरूवात होणाार आहे. महाप्रबोधन यात्रेची पहिली सभा फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. तर शेवटची सभा वरळीत होणार आहे. महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यभरात 40 सभा होणार आहेत.
महाप्रबोधन यात्रेदरम्यान तब्बल 40 सभांचे नियोजन
राज्यात सत्तेवर असणाऱ्या शिंदे-फडणवीस- पवार सरकारचा ढिसाळ कारभार, सर्वसामान्यांना मेटाकुटीला आणण्यासाठी केलेलं नियोजन हाणून पाडण्यासाठी त्याचा पर्दाफाश करण्यासाठी दृष्टिकोनातूनच उपनेत्या अंधारे यांची महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सभा होणार आहे. महानगरीय आणि उपनगरीय भागातून सुरू होत असलेल्या या महाप्रबोधन यात्रेदरम्यान तब्बल 40 सभांचे नियोजन करण्यात आले आहे. सभेचा श्रीगणेशा फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात होणार आहे. त्यानंतर अनुक्रमे सभाamravati , वाशिम, यवतमाळ,pune सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी , नाशिक धुळे, नंदुरबार, पनवेल, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर, मुंबई या ठिकाणी होणार आहे. समारोपीय सभा वरळी येथे होणार आहे. सुषमा अंधारे आणिmaharshta तील इतर शिवसेनेचे नेते देखील या महाप्रबोधन यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत.
सुषमा अंधारे यांच्या पहिल्या यात्रेला राज्यभरात सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळाला होता. या दौऱ्यातून आगामी लोकसभेसाठी बंडखोरांविरोधात काही संकेत देणार का? याचीही उत्सुकता आहे.
सुषमा अंधारे शिवसेनेची ढाल
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या पहिल्या महाप्रबोधन यात्रेचा जिल्हास्तरावरील समारोप 20 मे रोजी beed मध्ये झाला होता. संजय राऊत तुरुंगात गेल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा आक्रमक चेहरा म्हणून पक्षाला कमतरता भासू लागली. त्यानंतर दुसऱ्या पक्षातून आलेले आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्या खांद्यावर ही धुरा आली. यातुनच पक्षाची आक्रमक भुमिका मांडणारे महत्वाचे नेते म्हणून भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांचा उदय झाला. संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे शिवसेनेच्या अनेक नेत्यामध्ये कारवाई संदर्भात दहशत निर्माण झाली. त्यामुळे मोजके नेते सोडले तर फार विरोधकांवरती कोणी आक्रमक बोलायला तयार नव्हतं. शिवसेनेसमोर संकट उभं असताना सुषमा अंधारे शिवसेनेची ढाल बनल्या होत्या.