धुळे ग्रामीणचे आमदार, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवj छापा टाकण्यात आला आहे. अद्यापपर्यंत ही चौकशी सुरू असल्याचे माहिती आहे. 24 तास उलटल्यानंतर देखील अद्यापही तपास यंत्रणा तपास करीत आहे. तपास यंत्रणेकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. ही छापेमारी नेमकी कुठल्या कारणास्तव करण्यात आली आहे, याची सध्या कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळू शकलेली नसली तरी राजकीय आकसापोटी ही छापेमारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कुणाल पाटील यांच्यावर विदर्भातील लोकसभेची जबाबदारी सोपवताच त्यांच्या सूतगिरणीवर कारवाई करण्यात आल्याचे बोलले जाते. काही माजी कर्मचारी यांनी नुकतीच प्रशासनाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर ही कारवाई झाली असल्याची चर्चा आहे.पुणे, नाशिक येथून IT पथक शनिवारी आले आहे. सुमारे पाच कारमधून सकाळी हे पथक आले आहे. सूतगिरणीतील सुरक्षा रक्षकांचे मोबाइल बंद करण्यात आले आहे. दूरध्वनी कट करत गोदामाच्या चाव्याही पथकाने जप्त केल्या आहेत.
उठाव नसल्यामुळे विक्री होत नाही. गोदामात साठा पडून आहे. त्यामुळे आजपासून (१ ऑक्टोबरपासून) तिन्ही पाळ्यांचे कामकाज पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बिनपगारी बंद ठेवण्यात येत आहे. बाजारात सुधारणा झाल्यावर कामकाज पूर्ववत सुरू होईल, अशी सूचना सुतगिरणीच्या मुख्य गेटवर लावण्यात आली आहे.पथकाकडून रविवारी सकाळपर्यंत कार्यालयात कागदपत्रे तपासणी सुरू होती. सूतगिरणीची ऑडिट पूर्ण झाले असून संस्था ‘क’ दर्जामध्ये मोडते, असे असतानाही कारवाई झाली. आमदार कुणाल पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर दुपारी नेहमीप्रमाणे ५ ते ६ कार्यकर्ते व सुरक्षा रक्षक तैनात होते.