स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा २०२३ च्या गुणवत्ता यादीत ‘महाराष्ट्र’ चा दबदबा
निलंगा – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने उन्हाळी २०२३ मध्ये घेतलेल्या पदवी परीक्षेत निलंगाच्या महाराष्ट्र महाविद्यालयाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. गेल्या अनेक वर्षापासून स्वा.रा.ती.म. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र, बी.व्होक पदवी व पदव्यूत्तर विभागात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची यशाची परंपरा आहे. ती यावर्षीही विद्यार्थ्यांनी कायम ठेवलेली आहे.
विज्ञान शाखेतून कु. हजारे रचना हिने ९४:६३% गुण मिळवून विद्यापीठातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे, तर कु. ऋतुजा माशाळकर ही रसायनशास्त्र विषयात कै. नरहरराव शिंदे यांच्या स्मृतिपित्यर्थ दील्या जाणाऱ्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली तर कु. सुषमा बेलकुंदे ही राज्यशास्त्र या विषयात नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलु जि. परभणी सुवर्णपदक व स्वातंत्र्यसेनानी कै. दिपाजी पाटील सुवर्णपदकाची मानकरी ठरली. बी.व्होक.विभागातून वेब प्रिंटिंग अँड टेक्नॉलॉजी मधून कु. आकांक्षा माने व कु. शिल्पा लोभे यांनी विद्यापीठातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय येण्याचा बहुमान मिळवलेला आहे. तर याच विभागातील फूड टेक्नॉलॉजी अँड फूड प्रोसेसिंग या शाखेतून कु. श्रुती पवार, कु. भक्ती कुमठे, कु. वैष्णवी यादव यांनी विद्यापीठातून अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय स्थान मिळवून महाविद्यालयाचा दबदबा कायम ठेवलेला आहे. विशेष म्हणजे या सर्व विद्यार्थिनींचा गुणवत्ता यादीतील हा चढता आलेख उल्लेखनीय दिसतो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत महाराष्ट्र महाविद्यालयाचे एकूण आठ विद्यार्थी झळकलेले आहेत या गुणवंत विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी कौतुक करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने शिक्षण संस्थेचे सचिव मा. बब्रुवानजी सरतापे, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवतजी पौळ, महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवजी कोलपुके यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणगौरव पुरस्कार सोहळ्याच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. हंसराज भोसले यांनी केली, सूत्रसंचालन डॉ. गोविंद शिवशेट्टे ,वैभव सूर्यवंशी तर आभार डॉ. सुभाष बेंजलवार यांनी मानले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.