निलंगा काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा
निलंगा- निलंगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निलंगा काँग्रेस कार्यालयामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कै.शेषराव वाघमारे(आनंदमुनी) व जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर (माजी मुख्यमंत्री) यांच्या प्रतिमेस पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नूतन शहराध्यक्ष अजित नाईकवाडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,भारताला स्वातंत्र्य 1947 ला मिळाले.परंतु मराठवाड्याला 1948 मिळाले मराठवाडा विनाअट हेद्राबाद स्टेट मधून महाराष्ट्रात विलीन झाला.या लढयात स्वामी रामानंद तीर्थ,कै.शंकरराव चव्हाण,कै.शेषराव वाघमारे,कै.शिवाजीराव पाटील निलंगेकर अशा अनेक महान स्वातंत्र्यसैनिकांच्या सिंहाचा वाटा आहे.यामध्ये स्वातंत्र्य मिळवल्यापासून ते सामाजिक विकास कार्यामध्ये त्यांचे फार मोठे योगदान आहे.हे विसरून चालणार नाही यासाठी सरकारने मराठवाड्याला अनुशेष भरून काढण्यासाठी भरगोस मदत करावी असे ते म्हणाले. यावेळी अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,मा.नगराध्यक्ष हमीद शेख,मा.नगरसेवक अशोक शेटकार,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे,निलंगा तालुकाध्यक्ष अल्पसंख्यक लाला पटेल, माजी सभापती अजित माने,लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सूर्यवंशी,सोशल मीडिया विधानसभा उपाध्यक्ष आदेश जरीपटके,महादेव झरकर,नगरसेवक सुधीर लखनगावे,सोशल मीडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर वाडीकर, अनिल अग्रवाल,माजी उपाध्यक्ष अरविंद कांबळे,ऍड विक्रांत सूर्यवंशी,देविदास जाधव,श्रीधर चेले,सोहेल शेख,रोहन सुरवसे,व्यंकटराव साळुंके,पांडू शिंदे इ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.