• Tue. Apr 29th, 2025

शिक्षकांनी सामाजिक भान जपणारी पिढी निर्माण करावी : प्रा. डी. एन. संदानशिव

Byjantaadmin

Sep 18, 2023
शिक्षकांनी सामाजिक भान जपणारी पिढी निर्माण करावी : प्रा. डी. एन. संदानशिव.
मुंबई,फोर्ट (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)        भारतीय समाज व्यवस्थेमध्ये शिक्षकाला अतिशय महत्त्वाचे स्थान असून शिक्षकांनी देश उभारण्याच्या कामी सामाजिक भान जपणारी पिढी निर्माण करावी असे प्रतिपादन प्रा. डी. एन. संदानशिव यांनी केले. ते भगवा फौंडेशन मुंबई आयोजित सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी सिद्धार्थ महाविद्यालय फोर्ट मुंबई या ठिकाणी बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक योगीराज बागुल होते. यावेळी सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या पहिल्या सुलेखन स्पर्धेच्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभही पार पडला.  प्रमुख पाहुणे सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सूनतकरी, ज्येष्ठ धम्म प्रचारक धम्मचारी बोधिसेन, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, निर्माता व दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी डॉ. अशोक सुनतकरी (मुंबई), समीर शेख (कोल्हापूर), संतोष बारसागडे (चंद्रपूर), धनराज पाटील (पुणे), उमेश शंकर गाड (गोवा), जानवी पवार (नालासोपारा), डॉ. अनुराधा गोल्हार (पुणे), सुधीर कांबळे (शिराळा), मंगल यादव (शिराळा), प्रा. सुभाष कोरे (गडहिंग्लज), देवदत्त सावंत (लातूर), महंमदइलियास आप्पासो खैरदी (बेळगावी), विष्णू कार्वेकर (कोल्हापूर), विभावरी मेश्राम (कल्याण) यांना सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार-2023 देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भगवा फाउंडेशन तर्फे आयोजित सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या पहिल्या सुलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. त्यात प्रमथ क्रमांक भरत रामटेके द्वितीय क्रमांक अर्चना अडसूळे, लता गायकवाड आणि वंदना झाल्टे, तृतीय क्रमांक यशोदीप रीकीबे, मयुरेश देसाई तसेच डॉ. सुनिता मेश्राम, मीनल वानखेडे, सयाजीराव कांबळे, विनायक पाटील, झेबा शेख, अक्षरा अडसुळे, हेमलता सोनवणे, अल्का झेंडे आणि रंजना क्षीरसागर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्तेजनार्थ पारितोषिके देवून गौरविण्यात आले. यावेळी कृष्णमूर्ती दासरी, प्रा. बेले सर, प्रा. विजय मोहिते, डॉ. पद्माकर तामगाडगे, केशव कांबळे, राजवीर जाधव, अमर पारखे, विजया कांबळे, बचाराम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रस्तावित भगवा फौंडेशनच्या अध्यक्षा छाया पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार अभिषेक कासे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed