• Tue. Apr 29th, 2025

लग्न झालेले नवदाम्पत्य लग्न मंडपातून थेट उपोषण मंडपात…

Byjantaadmin

Sep 18, 2023

अहमदनगर : जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास सर्वच घटकांकडून पाठिंबा मिळत आहे. रविवारी तालुक्यातील हळगाव येथे लग्न झालेले नवदाम्पत्य लग्न मंडपातून थेट उपोषण मंडपात येऊन बसले. समाजातर्फे सुरू असलेल्या उपोषणास आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.धनगर आरक्षणप्रश्नी जामखेड चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने गेल्या १३ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला विविध संघटना पदाधिकारी पाठिंबा देत आहेत. १७ सप्टेंबरला तालुक्यातील हळगाव येथे हरिश्चंद्र खरात या तरुणाचा प्रतीक्षा होमले यांच्याशी विवाह झाला. गावातील खरात वस्ती येथे दुपारी विवाह झाला. त्यानंतर लगेच हे जोडपे चौंडीला आले. तेथे त्यांनी सुरू असलेल्या उपोषणात काही काळ भाग घेत आपला पाठिंबा व्यक्त केला. आमच्यासाठी विवाह सोहळा हा महत्वाचा आहेच, पण समाजासाठी आरक्षणही तेवढेच महत्वाचे आहे, त्यामुळे पाठिंबा देण्यासाठी येथे आलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

Newly Weds Couple Meet Agitator who dement Dhangar reservation in ST Category

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed