घरगुती गॅस सिलिंडरर्स लवकरच ‘क्यूआर कोड’शी जोडले जाणार आहेत. याबाबतची माहिती देशाचे पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी दिली. याचा फायदा गॅस सिलिंडरर्सचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या तसेच ग्राहकांनादेखील होणार आहे. या क्यूआर कोडमुळे गॅस सिलिंडरला ट्रॅक करता येणार आहे. तसेच सिलिंडर चोरीदेखील रोखता येणार आहे.
हा एक उल्लेखनिय उपक्रम आहे. गॅस सिलिंडर्सवर क्यूआर कोड लावला जाईल. जुन्या तसेच नव्या सर्व गॅस सिलिंडर्सवर हा कोड लावण्यात येईल. क्यूआर कोड जेव्हा सक्रिय होईल, तेव्हा अनेक अडचणी दूर होतील. यामुळे गॅस सिलिंडर्सची चोरी रोखता येणार आहे. तसेच गॅस सिलिंडर कुठपर्यंत पोहोचले आहे, याचा शोध घेता येईल. गॅस सिलिंडर पोचवण्यासाठीचे व्यवस्थापन सोपे होणार आहे, असे हरदीपसिंग पुरी म्हणाले आहेत.
लवकरच सर्व घरगुती गॅस सिलिंडर्सना क्यूआर कोड
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २० हजार गॅस सिलिंडर्सना क्यूआर कोड लावण्यात आलेला आहे. तर पुढील काही महिन्यात १४.२ किलो वजनाचे सर्व घरगुती गॅस सिलिंडर्स क्यूआर कोडशी जोडले जातील.