• Wed. Apr 30th, 2025

गणेशोत्सवादरम्यान मंडप उभारणी सोबतच ढोल ताशासंदर्भात  उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे  पालन व्हावे :  ॲड. सूरज  साळुंके

Byjantaadmin

Sep 15, 2023
गणेशोत्सवादरम्यान मंडप उभारणी सोबतच ढोल ताशासंदर्भात  उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे  पालन व्हावे :  ॲड. सूरज  साळुंके
 लातूर :  गणेशोत्सव – नवरात्रोत्सवात रस्त्यावर मंडप  उभारणी करताना संबंधितांनी रहदारीला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन मंडप उभारावेत.  व तसेच ढोल – ताशा, डीजे संदर्भात उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असुन न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबतचे आदेश उच्च न्यायालयाने प्रशासनास दिल्याची माहिती ॲड. सूरज  साळुंके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
                   गणेशोत्सव, आता तोंडावर आले आहेत. अशावेळी मंडपाची उभारणी करताना तो रस्त्यात येणार नाही, त्याचा वाहनधारकांना व पादचारी नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी संबंधितांनी घेणे गरजेचे असुन मंडप उभारणी करण्यापुर्वी  आवश्यक त्या सर्व  विहित परवानग्या घेणे आवश्यक असताना लातुर मधील काही गणेश मंडळ कोणतीही परवानगी न घेता रस्त्यावर मंडप उभारत आहेत.  अशा  मंडळावर गुन्हे दाखल करण्याबाबतचे  निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. व तसेच उत्सवादरम्यान ढोल – ताशा , डीजेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याने ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी उच्च न्यायालयाने आखून दिलेली ध्वनी मर्यादा पाळणे बंधनकाराक असताना व यासाठी प्रतिबंधात्मक कायदे अस्तित्वात असताना देखील स्थानिक प्रशासन राजकीय दबावामुळे कार्यवाही करण्यास टाळाटाळ करित असल्याने उत्सवादरम्यान न्यायालयाच्या आदेशानव्ये कार्यवाही न करणाऱ्या प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे न्यायालयाने त्यांच्या आदेशात स्पष्टपणे नमुद केले आहे.
                  लातूर शहरात मुख्य रस्त्यावरील दुभाजकात उभारण्यात आलेल्या नियमबाह्य युनीपोल/जाहीरात फलक संदर्भांत बोलताना आशिष कोकाटे यांनी सांगितले की, या जाहिरात फलकाच्या उभारणीबाबत कोणत्याही नियमांचे पालन संबधित कंत्राटदाराने केलेले नसून सदर जाहिरात फलकाची  उभारणी करताना हे फलक नेमके किती प्रमाणात असले पाहिजेत याचेही पालन केले गेलेले नाही.  त्यामुळे रस्त्या वरिल वाहनधारकांच्या व नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होत असल्याने याची जाणीव राज्याच्या  मुख्यमंत्र्यांसह औरंगाबाद विभागातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन व तक्रार अर्जाच्या माध्यमातून करून देण्यात आली  आहे. केवळ एवढेच नाही तर लातुरात हे जाहिरात फलक उभारणी करताना उच्च न्यायालयाच्या आदेशाचा देखील अवमान संबंधितांकडून करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या बाबत मनपा प्रशासनाकडे निवेदन देऊनही संबंधितांविरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही हे आश्चर्यकाराक असल्याचे नमुद करुन मनपाकडून पुढील आठ दिवसात यावर कठोर कारवाई न झाल्यास यासंदर्भातही   उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आसल्याचे कोकाटे  यांनी  स्पष्ट केले.  उच्च न्यायालयात याचिकाकर्ता ॲड. सूरज  साळुंके यांच्यातर्फे  ॲड. प्रियंका  शिंदे व  ॲड. प्रशांत जाधव यांनी बाजू मांडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed