लातूरच्या हक्काच्या पाण्यासाठी जनरेट्याची गरज-माजीमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर
जनजागर मंचच्या बैठकीत एकत्रीत लढा उभारण्याचे केले आवाहन
लातूर/प्रतिनिधीः- लातूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न अतिशय जटील असून लातूरला हक्काचे पाणी मिळावे याकरीता योग्य पर्याय आवश्यक आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सध्याची व भविष्यातील पाण्याची स्थिती काय असेल याबाबत लोकांमध्ये जागृती आवश्यक आहे. या बाबीचा विचार करूनच जनजागर मंचच्या वतीने पाणी, शिक्षण आणि रोजगार हे तिन विषय घेऊन लढा उभा करण्याचा निर्धार केला आहे. लातूरला हक्काचे पाणी मिळावे याकरीता जलसाक्षरता रॅली काढण्यात येत असून या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करून आवश्यक असलेल्या जनरेट्यासाठी पाठिंबा मिळविण्यात येणार आहे. त्याचबरोबर लातूरला हक्काचे पाणी मिळावे याकरीता जनरेट्यासोबतच एकत्रीत लढा उभा करण्याची गरज असल्याचे सांगून याकरीता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीसह, गणेशमंडळ व सामाजिक संघटनाच्या पदाधिकार्यांनी एकत्रीत यावे असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
लातूर येथील राधिका कन्व्हेंशन सेंटरमध्ये जनजागर मंचच्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान काढण्यात येणार्या जलसाक्षरता रॅलीची माहिती देण्यासाठी व यामध्ये सहभागी होण्याकरीता घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय व गणेश मंडळ आणि सामाजिक संघटनेंच्या पदाधिकारी बैठकीमध्ये माजीमंत्री आ. निलंगेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर औश्याचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अफसर शेख, शैलेश गोजमगुंडे, मनसेचे शिवकुमार नगराळे, लातूर शहर भाजपा जिल्हाध्यक्ष देविदास काळे, गुरुनाथ मगे, औश्याचे माजी नगराध्यक्ष किरण उटगे, जि.प.चे माजी अध्यक्ष मिलिंद लातूरे, शिवकुमार चिंचनसुरे, नरसिंग बिराजदार, निळकंठ मिरकले, महेश कौळखेरे, देवा गडदे, वैशाली यादव, गणेश गोमसाळे, निखील गायकवाड आदींची उपस्थिती होती.
राजकीय क्षेत्रात काम करीत असताना सामाजिक बांधीलकी जोपासणेही तितकेच गरजेचे असल्याचे सांगून माजी मंत्री आ.निलंगेकर म्हणाले की, लातूर जिल्हयाला हक्काचे पाणी मिळाले तर त्यातून रोजगार निर्माण होईल आणि विकासालाही अधिक चालना मिळेल. मात्र लातूरला ज्या-ज्या वेळी हक्काचे पाणी मिळावे यासाठी चर्चा होती. त्या-त्या वेळी उजनीच्या पाण्याचा पर्याय सुचविला जातो. मात्र उजनीचे पाणी खरेच मिळणार का? असा प्रश्न उपस्थित करून उजनीचे पाणी लातूरला मिळावे याकरीता कोणताही प्रस्ताव अथवा कागद अद्यापही शासन दरबारी नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळेच आता सरकारने मराठवाड्याला वाहून जाणारे पाणी देण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याबाबत योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवून लातूरला हक्काचे पाणी कसे मिळेल याकरीता शासनाकडे पर्यायही उपलब्ध करून देण्याचे नियोजन जनजागर मंचच्या वतीने करण्यात येत असल्याचे सांगितले. जनजागर मंच हे अराजकीय व्यासपीठ असून केवळ आणि केवळ लातूरच्या हक्काच्या पाण्यासाठी या मंचच्या माध्यमातून शासनदरबारी पाठपुरावा आणि जनतेमध्ये याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगून माजीमंत्री आ. निलंगेकर म्हणालेे की याकरीता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यासह गणेश मंडळ व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी एकत्रीत येऊन जलसाक्षरता रॅलीत सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त केली.
गणेशोत्सवा दरम्यान लातूर जिल्ह्यात ही जलसाक्षरता रॅली काढण्यात येणार असून लातूरच्या हक्काच्या पाण्यासाठी गणेश मंडळांसह सर्वपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी या रॅलीच्या माध्यमातून संवाद साधण्यात येणार असल्याचे आ.निलंगेकर म्हणाले. या पाठिंब्याच्या माध्यमातून जनरेटा तयार करून शासन दरबारापर्यंत या जनरेट्याचा आवाज पोहचविण्यासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन जनआंदोलन उभे करणे आवश्यक आहे. त्यामुळेच लातूरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवीण्यासह रोजगारांच्या संधी आणि केंद्रीय विद्यापीठ, एम्स व आयआयटी सारख्या विद्यापिठांची मागणी पुर्ण करून घेण्यासाठी जिल्हाभरात जनआंदोलन उभे करण्यासाठी सर्वांनी एकत्रीत यावे असे आवाहन माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी केले.
या बैठकींमध्ये डॉ.अफसर शेख, शिवकुमार नगराळे, देविदास काळे यांच्यासह डॉ. पवन लड्डा आदींनी आपले मनोगत व्यक्त करून लातूरच्या हक्काच्या पाण्यासाठी आम्ही एकत्रीत येऊन लढा उभा करू असाविश्वास यावेळी व्यक्त केला. बैठकीचे प्रास्ताविक अॅड. शैलेश गोजमगुंडे तर सुत्रसंचलन सुरेश जाधव यांनी केले. या बैठकीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.