• Wed. Apr 30th, 2025

विलास साखर कारखान्याच्या २१ वी अधिमंडळाच्या सभेत उत्कृष्ट ऊसउत्पादक, तोडणी वाहतूक ठेकेदारांचा सत्कार

Byjantaadmin

Sep 14, 2023

विलास साखर कारखान्याच्या २१ वी अधिमंडळाच्या सभेत उत्कृष्ट ऊसउत्पादक, तोडणी वाहतूक ठेकेदारांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) गुरूवार दि. १४ सप्टेंबर २०२३ : गळीत हंगाम सन २०२१-२२ मध्ये सर्वांधीक ऊसपुरवठा करणारे सभासद, ऊस तोडणी व वाहतूक करणारे ठेकेदार हार्वेस्टरव्दारे तोडणी व वाहतूक करणारे ठेकेदार यांचा पारीतोषीक देऊन सत्कार विलास सहकारी साखर कारखाना ली.,वैशालीनगर निवळी येथे २१ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत विभागवार विक्रमी ऊस उत्पादन करणारे ऊस पुरवठादार यांचा सत्कार राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये बाभळगाव विभागातून सर्वाधीक उसपुरवठा चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, वैशालीनगर विभागातून विशाल पाटील, शिराळा विभागातून शिवाजीराव बावणे, विलासनगर विभागातून महिंद्र मुळे, कासारजवळा विभागातून अरुणा मुंडे यांनी केला आहे. तर ऊस तोडणी ठेकेदार जीवन टेकाळे, संजय राठोड, माधव स्वामी, महादेव जाधव, शिवाजी कदम, रमाकांत राठोड, बालाजी शिंदे, किशोर शिंदे, महेश पानखडे, हार्वेस्टर ठेकेदार सतीश जाधव, महिंद्र मुळे, जीवन गवळी तर तोडणी ठेकेदार शिवाजी कदम, महादेव जाधव, रमाकांत राठोड बैलगाडी ठेकेदार शंकर गडदे, अश्रूबा बिरगड, विठ्ठल होळगीर यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी बैलगाडी ठेकेदार, ऊस तोडणी ठेकेदार, कामगारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरूनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, रंजीत पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सूडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *