हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टी झाल्याने गेल्या महिन्यात या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर या ठिकाणी पुनर्वसनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे करत असताना, आपत्तीग्रस्तांना मदत करताना पक्षीय राजकारण केले जाऊ नये, असे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने यावर नाराजी व्यक्त करत प्रियांका गांधी यांनी मदत करण्याचे आवाहन केले आहे.हिमाचल प्रदेशात १२ ते १४ जुलैदरम्यान अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये मंडी जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान घडून आले. पावसामुळे भूस्सखलनाच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर या ठिकाणी पुनर्वसनाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची पाहणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली. येथील पुनर्वसनाच्या कामाचा आढावा गांधींनी घेतला.
प्रियांका गांधी यांनी या वेळी राज्यात भाजपचे किंवा काँग्रेसचे सरकार आहे की नाही, याचा विचार न करता पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याशिवाय या ठिकाणी राष्ट्रीयआपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. प्रियांका गांधी यांनी केलेल्या मागणीनंतर या ठिकाणी कशा प्रकारे मदत केली जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.