पत्रकार परिषदेमध्ये जाताना फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याचं बोलायचं, इतर काही राजकीय वक्तव्य करायचं नाही अशी आमची चर्चा झाली होती, पण सोशल मीडियाच्या माध्यामातून त्यामध्ये तोडफोड करुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असा मेसेज पसरवला जात आहे, ते चुकीचं आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. अपप्रचाराला आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टींना मराठा समाजाने बळी पडू नये असंही मुख्यंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संवादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर या सोशल मीडियातून राज्य सरकारवर मोठी टीका होत आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं.
काय म्हणाले?
मराठा समाजाला, मराठा क्रांती मोर्चा आणि समन्वयकांनाही आवाहनवजा विनंती आहे, त्यादिवशी सह्याद्री अतिथीगृहात पहिल्यांदाच अशापद्धतीने सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. साधक बाधक चर्चा झाली. राज्यात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करताना आम्ही बोलत बोलत येत होतो, ज्या मुद्यावर चर्चा झाली, प्रॅक्टिकल मुद्यांवर चर्चा झाली यावरच बोलूया, राजकीय विषय नको अशी आमची चर्चा सुरू होती.
कुठलंही राजकीय भाष्य, प्रश्नोत्तरे आज नको अशी चर्चा आम्ही करत होतो. परंतु काही लोक सोशल मीडियावर काहीही अर्थ काढून, संभ्रमाचं वातावरण तयार होईल, मराठा समाजाला आरक्षण देताना या माध्यमातून विघ्नसंतोषी लोक हे करत आहेत