अशोकराव पाटील मित्र मंडळाची शाखा गुऱ्हाळ येथे स्थापन
निलंगा- मौजे गुऱ्हाळ येथे अशोकराव पाटील मित्र मंडळाची स्थापना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यांच्या शुभहस्ते फीत कापून उदघाटन मोठया उत्साहाने करण्यात आले.यावेळी अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा.दयानंद चोपणे,निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, मित्र मंडळाचे संस्थापक सदस्य लाला पटेल,निलंगा शहराध्यक्ष अजित नाईकवाडे,तालुका उपाध्यक्ष सोनाजी कदम,मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष वसंत वाडीकर,माजी सरपंच व्यंकटराव वाडीकर,वसंत चांदूरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की,सध्या देशामध्ये राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला असून आताचे राजकारण म्हणजे फोडाफोडी करून जनतेमध्ये संब्रह्म निर्माण केला जात असून यापुढे मित्र मंडळाच्या माध्यमातून स्व.निलंगेकर साहेबानी केलेले कार्य पुढे नेण्यासाठी ८०% समाजकारण व २०% राजकारण हा हेतू घेऊन पुढील काळात युवक वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन.येणाऱ्या काळात सामाजिक कार्याबरोबर राजकीय कार्य करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन जातीयवादी राजकारणापासून दूर राहून धर्मनिरपेक्ष विचाराची प्रेरणा घेऊन काँग्रेस पक्षाला बळकटी घ्यावी व आपले नेते राहुल गांधी व स्व.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विचारधारेची प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले.यावेळी लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सूर्यवंशी, कमलाकर जाधव,मोहम्मद अरब,बळी गोमसाळे, बाळासाहेब देशमुख,बब्बर पठाण,मित्र मंडळाचे पदाधिकारी सहदेव भोसले,अमोल भोसले,अमोल दूधभाते,विनोद मुंगणाले, अक्षय शेळके, युवराज रूपनर,निवृत्ती धानुरे,दिगंबर काळे,महेश सावंत,पांडुरंग भोसले,दिगंबर चांदूरे,कमलाकर मेहत्रे,महेश सावंत,खंडू जाधव,किसन मुंगनाळे, शाहूराज वाडीकर,विनायक सावंत,राम भोसले,शहाजीराव खंडेकर,गणू मोगिले,व्यंकट भोसले,आनंदा भास्कर,दिगंबर शिंदे,सखाराम माने,अशोक माने,बालाजी मोरे,ज्योतिराम शेळके,परमेश्वर चांदूरे,भरत खंडेकर,कुलदीप चांदूरे,विकास मंडले, सत्यवान भोसले,वाघू भोसले,संतोष धानुरे,दत्तात्रय विटूंबिने,अंकुश धानुरे,व समस्त कार्यकर्ते,गावकरी,महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.