कृषी सेवक पदांसाठी भरती जाहीर 3 ऑक्टोबर, 2023 पर्यंत अर्ज करता येणार
लातूर, दि.13 (विमाका) : कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, लातूर विभाग, लातूर कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील कृषी सेवक पदांच्या भरतीसाठीची जाहिरात 11 ऑगस्ट, 2023 रोजी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची लिंक दिनांक 14 सप्टेंबर, 2023 ते 03 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत संकेतस्थळावर उपलब्ध राहील. ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सुचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबतची माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.