• Fri. May 2nd, 2025

ऋषी सुनक यांचा साधेपणा पाहून भारतीय झाले फॅन

Byjantaadmin

Sep 12, 2023

दिल्लीमध्ये ९ आणि १० सप्टेंबर रोजी जी-२० शिखर संमेलन पार पडले. या संमेलनाला जगभरातील तब्बल २० देशांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या संमेलनात जागतिक अर्थव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध देशांच्या नेत्यांनी G-20 मध्ये आपले विचार व्यक्त केले. पण या सर्वांमध्ये खरं लक्ष वेधून घेतलं ते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

rishi sunak and wife akshata murthy visit akshardham while g20 summit photo viral news in marathi

 

या फोटोमध्ये ते आपल्या पत्नीसोबत चालताना दिसत आहेत. या व्हायरल फोटोवर नेटकरी गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका देशाचे पंतप्रधान असूनही त्यांचा साधेपणा पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. चला तर मग पाहूया नेटकरी म्हणतायेत तरी काय? जी-२० मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका, तुर्की, युनाएटेड किंग्डम आणि अमेरिकेचा समावेश आहे. यासह यूरोपियन यूनियन देखील जी-२० चा सदस्य आहे.

https://twitter.com/ShriBalaji15_/status/1700840989605130580?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1700840989605130580%7Ctwgr%5E6cf476062b8242682b2e4621ecb5a0cbf8d2fa55%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fviral%2Fviral-news%2Frishi-sunak-and-wife-akshata-murthy-visit-akshardham-while-g20-summit-photo-viral-news-in-marathi%2Farticleshow%2F103580083.cms

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *