नडी बोरगाव येथील श्री सिध्देश्वर मंदिरात माजी मंत्री दिलीपराव देशमुख आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते महापूजा मान्यवरांची मोठी उपस्थिती
लातूर -श्रावण महिन्याच्या निमित्ताने लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव येथील श्री सिध्देश्वर मंदिरात राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब व लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते सोमवारी महापूजा करण्यात आली यावेळी देशमुख कुटुंबांनी. श्री प्रभू सिध्देश्वर चरणी प्रार्थना करत बळीराजाला दिवस चांगले येवू दे पाऊस पडावा अशी प्रार्थना करत मनोभावें पूजा केली यावेळी माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील रेणा चे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव , जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, सुनील पडीले, अँड प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर भिसे अभिमान भोळे आदी मान्यवर उपस्थित होते
सिध्देश्वर मंदिर हिंदू- मुस्लिम धर्माचे प्रतीक
यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी कानडी बोरगाव येथील सिध्देश्वर मंदीर हे हिंदू मुस्लिम धर्माचे प्रतीक असून त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पारंपारिक शिकवण हिंदू समाजाची राहिलेली आहे या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले मंदिर असून गावातील सर्व समाजाची लोक इथ येवून दर्शन घेवून मनोभावे प्रार्थना करतात वेगळं गावाचं वैशिष्ट राहीलेले आहे असे सांगून माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की आम्ही गरीब श्रीमंत असा भेदभाव करीत नाही जो कार्यकर्ता आहे सगळ्यांवर आम्ही प्रेम करत आलोय भविष्यात आम्ही सर्वांना सोबत घेऊन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला
आमदार धीरज देशमुख यांच्या कार्याचे कौतुक
यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की लातूर ग्रामीण मतदार संघातील विकासकामे सुरू आहेत तसेच जिल्हा बँकेच्या वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम हाती घेतले असून त्यासाठी ते स्वतः अतिशय चांगल कार्य करत असल्याचे चित्र दिसत आहे त्याबद्दल आमदार धीरज देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले
सिध्देश्वर मंदिरासाठी १० लाख रुपये निधी
यावेळी बोलताना आमदार धीरज देशमुख म्हणाले की प्राचीन काळात असलेल्या सिध्देश्वर मंदीर सभागृह बांधण्यासाठी १० लाख रुपये निधी जाहिर केला तसेच मांजरा नदीच्या पुरामुळे नादुरुस्त असलेल्या बोरगाव अंजनपुर गेट दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून रस्त्याची कामे प्रलंबित विकासकामे लवकरच मार्गी लावू यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजांना जिल्हा बँक मदत करनार
राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हा बँकेने अनेक योजना राबवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे नुकताच जिल्हा बँकेला मानाचा वैकुंठभाई मेहता पुरस्कार मिळाला यामागे आदरणिय दिलीपराव देशमुख यांची प्रेरणा त्यांची शिस्त कठोर परिश्रम उत्तम व्यवस्थापन यातून आर्थिक सुबत्ता मिळाली असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या बदलत्या गरजांना जिल्हा बँक मदत करणार असल्याचा विश्वास लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी उपस्थितांना दिला
या प्रसंगी कोंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, मदन भिसे, कैलास काळे, अमर मोरे शिवाजीराव देशमुख, जनार्दन मोरे माणिकराव पुजारी, अमीत गुजर, संजय चव्हाण, एकनाथ पाटील, प्रविण सुर्यवंशी सतीश पाटील, विजय कदम गावातील ग्रामस्थ भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक अभिमान भोळे यांनी केले तर रेणा साखर कारखान्याचे संचालक अँड प्रविण पाटील यांनी मनोगत व्यक्त केलेमाजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब आमदार धीरज देशमुख यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ठीक ठिकाणी केले स्वागत