• Sat. May 3rd, 2025

आंदोलनावर आज तोडगा शक्य?:जरांगेंचे संकेत, भिडेही दाखल, उपोषणस्थळावरुन खोतकरांची मुख्यमंत्र्यांसोबत व्हीसीद्वारे बैठक

Byjantaadmin

Sep 12, 2023

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री संदीपान भुमरे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. त्यांची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांची उपोषण स्थळी दाखल झाले आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळत चाचली आहे. अखेर गावकऱ्यांनी त्यांना सालाईन घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे मनोज जरांगे यांनी सलाईन घेतले आहे. डॉक्टरांच्या पथकाने रात्री साडेबारा वाजता त्यांच्या आरोग्याची तपासणी केली. त्या नंतर मनोज जरांगे यांना सलाईन लावण्यात आले. आपल्या भूमिकेबाबत मनोज जरांगे हे सकाळी 10 वाजा पत्रकार परिषद घेणार आहेत. तर दुपारी दोन वाजता ते सर्व समाजबांधवांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत.

राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांची अनेकदा चर्चा झाल्यानंतरही मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलेले नाही. त्यामुळे त्यांची प्रृकती खालवत चाचली आहे. त्यामुळे राज्य सरकारचीही चिंता वाढली आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत असल्याने गावातील नागरिक देखील त्रस्त आहेत. त्यामुळे गावातिल महिला रडत होत्या. अखेर गावातील महिला आणि गावकऱ्यांचा मान राखत मनोज जरांगे यांनी सलाईन घेण्यास होकार दिला.

… तर उपोषण मागे घेईल
सरकारला वेळ कशासाठी हवा, याचे योग्य कारण दिले पाहिजे. सरकारने योग्य कारण दिले तर आपण दोन पावले मागे यायला तयार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. आरक्षण खरेच देणार का? याचे उत्तर मात्र, मिळायला हवे, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

15 दिवसांपासून उपोषण
राज्यातील मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात गेल्या 15 दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषण करत आहेत. रविवारपासून मनोज जरांगे यांनी उपचार आणि पाणी घेणं देखील बंद केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत अशी आग्रही मागणी गावकऱ्यांनी त्यांना केली. अखेर त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवर ते ठाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *